मोठी बातमी! पूजा खेडकरला धक्का, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

मोठी बातमी! पूजा खेडकरला धक्का, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

Delhi court denies anticipatory bail to former trainee IAS officer Puja Khedkar: परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना आणखी एक धक्का बसला असून दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. काल गुरुवारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज दुपारी न्यायालय निर्णय देणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर आज पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

“पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग, एम्स बोर्डाचंही प्रमाणपत्र”, कोर्टात नेमकं काय घडलं..

पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनावर तत्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. पण कोर्टाने ही मागणी मान्य केली नव्हती. त्यानंतर अखेर बुधवारी सुनावणी झाली. पूजा खेडकर यांच्यावतीने अॅड. बीना माधव यांनी बाजू मांडली. पूजा खेडकर यांच्या वकिलांनी सांगितलं की पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग आहेत. त्यांना जे दिव्यांगत्व प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डाने दिलं आहे मग त्यात फ्रॉड काय असू  शकतो, असा दावा करण्यात आला होता.

पूजा खेडकरांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष आला आहे. परीक्षार्थी होण्यासाठीही तिला कायम संघर्ष करावा लागला. आम्ही पाच अटेम्प्ट चांगल्या हेतूनेच दिल्या होत्या. पूजा दिव्यांग आहे. तिच्या आई वडिलांचाही घटस्फोट झाला आहे. ती दिव्यांग आहे म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल केला का असा दावा पूजा खेडकरांच्या वकिलांनी युक्तिवादात केला होता.

मोठी बातमी : वादग्रस्त पूजा खेडकरांचे IAS पद गेलं; यूपीएससीची मोठी कारवाई

यानंतर न्यायालयाने खेडकरलाही काही प्रश्न विचारले होते. तुम्ही जर म्हणत आहात की तीन अतिरिक्त अटेम्प्ट देण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली होती तर मग एक करून दाखवून द्या की तुम्हाला परवानगी कशी मिळाला होती. उच्च न्यायालयाचे निकालपत्र दिव्यांगत्वाविषयी आहे असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यावर पूजा खेडकर यांनी मी जेव्हा यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा प्रत्येक वेळी उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा आधार घेतला होता असे उत्तर पूजा खेडकर यांनी न्यायालयात दिले होते.

या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज निर्णय देत न्यायालयाने पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube