मोठी बातमी : वादग्रस्त पूजा खेडकरांचे IAS पद गेलं; यूपीएससीची मोठी कारवाई

  • Written By: Published:
मोठी बातमी : वादग्रस्त पूजा खेडकरांचे IAS पद गेलं; यूपीएससीची मोठी कारवाई

UPSC Cancels Provisional Candidature of Puja Khedkar : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन प्रकरणात खेडकर दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

एवढेच नव्हे तर, पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीवरही बंदी घातली आहे. त्यामुळे पुजा खेडकरसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या 2009 ते 2023 या काळातील सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई केली आहे.पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे.

दुसरीकडे आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. पुजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला. ज्यावेळी आम्ही ‘Puja’ नाव बदलून ‘Pooja’ असं केलं त्यावेळी गॅझेट नोटिफिकेशन केलं होतं असा दावा पूजा खेडकरच्या वकिलांनी केला.

तसेच आपल्याला मिळालेलं दिव्यांग प्रमाणपत्र एम्स बोर्डाने दिलं आहे मग त्यात फ्रॉड काय? असा सवाल विचारण्यात आला. मी लैंगिक छळाची तक्रार केल्यानेच मला अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असल्याचा दावा पूजा खेडकर यांनी केला. दरम्यान, न्यायालयाने पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीनावर निकाल राखून ठेवण्यात आला आहे. कोर्ट उद्या सायंकाळी यावर निर्णय देणार आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सुरुवातीला पूजा खेडकर या केवळ त्यांच्या वागणुकीमुळे चर्चेत आल्या होत्या. स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल झाले. याची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य शासनाला लिहिलेले पत्र समोर आले. त्यातून हे प्रकरण केवळ ऑडी गाडी पुरतेच मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले.

पिपाडांची एक घोषणा अन् विखेंना टेन्शन; शिर्डीसाठी रणशिंग फुंकलं…

या पत्राप्रमाणे, खेडकर यांची ऑफिसमधील वागणूकही राजेशाही होती. स्वतंत्र केबिनची, गाडीची, बंगल्याची आणि शिपायाची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. जिल्हाधिकारी बाहेर गेले असताना, त्यांनी वरिष्ठांचे अँन्टी चेंबर बळकावल्याचेही समोर आले होते. त्यांच्या या वागणुकीवर बेशिस्तपणाचा ठपका ठेवत दिवसे यांनी पत्र लिहून खेडकर यांच्या बदलीची मागणी केली.

Telegram CEO चं अजब रेकॉर्ड! लग्न न करताच 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप, विकी डोनर चित्रपटाशी कनेक्शन?

मोठी बातमी! कॉ. पानसरे खूनप्रकरणी तावडेचा जामीन रद्द, तात्काळ ताब्यात घेण्याचे कोर्टाचे आदेश त्यानंतर खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदलीही झाली. पण जसे जसे दिवस जातील तसे तसे त्यांच्याशी संबंधित रोज एक नवे प्रकरण समोर येत गेले. त्यांनी अपंगत्व आणि ओबीसी (नॉन क्रिमिलेअर) कोट्यातून युपीएससीची परीक्षा दिल्याचे समोर आले. पण या दोन्ही प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यांनी 52 टक्के दृष्टी दोषाचे आणि मानसिकरित्या अस्वस्थाचे प्रमाणपत्र कसे मिळविले असे विचारले जाऊ लागले.

Government Schemes : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येणार?

पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे स्वतः सनदी अधिकारी होते. त्यांची पेन्शनच काही लाखांमध्ये असते. त्याचबरोबर त्यांनी अमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविताना 40 कोटींची संपत्ती दाखविली होती. स्वतः पूजा खेडकर यांचीही 17 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर येऊ लागली. तरीही त्यांना हे प्रमाणपत्र कसे मिळाले? याबाबत तपास व्हायला पाहिले अशी मागणी केली जाऊ लागली. माहिती अधिकारी कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी हे प्रकरण उचलून धरले.

‘हे माझं शेवटचं ऑलिम्पिक होतं’; भारतीय बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पाकडून निवृत्तीची घोषणा

या प्रकरणानंतर पूजा खेडकर यांची संपत्ती, बंगला, बंगल्याच्या आवारातील पाच गाड्या, विविध कंपन्या, फ्लॅट, जमीन अशा गोष्टींची चर्चा होऊ लागली. हे सुरु असतानाच मनोरमा खेडकर यांचा एक वर्षापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल झाला. यात पिस्तुलाच्या आधारे त्या एका शेतकऱ्याला धमावत असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांच्या बंदुकीचे लायसन्स का रद्द करु नये अशा आशयाची पोलिसांची नोटीस धडकली.

“एकतर तू तरी राहशील नाहीतर मी”; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट ललकारलंच

आता पूजा खेडकर यांनी नाव बदलून अकरा वेळा युपीएससीची परीक्षा दिली असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सहा आणि ओबीसी कोट्यातील उमेदवारांना नऊवेळा परीक्षा देता येते. पण हे प्रयत्न संपल्यानंतर पूजा दिलीप खेडकर ऐवजी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव बदलून त्यांनी अकरा वेळा परीक्षा दिली असल्याचे बोलले जात आहे.

या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागिवला होता. हा अहवाल अकादमीला प्राप्त होताच पत्र पाठवून पूजा खेडकर यांना परत पाठविण्यास सांगितले. त्यानुसार राज्य सरकारने खेडकर यांचा पुढील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम थांबविला असून त्यांची तात्काळ जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्तता केली आहे. त्यांना 23 जुलैपर्यंत मसुरीमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube