सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर पुरती अडकली; वाचा सुनावणीत काय घडलं?

SC directs Puja Khedkar to appear before Delhi Police : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर ( Puja Khedkar) पुरती अडकल्याचं समोर आलंय. सुनावणीत नेमकं काय घडलं, सर्वोच्च न्यायालयाने नेमके कोणते आदेश दिले ते सविस्तर पाहू या. नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचे फायदे चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा आरोप असलेल्या माजी आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकर आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिला 2 मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर (Delhi Police) हजर राहण्याचे निर्देश दिले.
SC directs former IAS probationer Puja Khedkar to appear before Delhi Police on May 2 in cheating case
— Press Trust of India (@PTI_News) April 21, 2025
मनसेसोबतच्या युतीसाठी बायकोला विचारलं का? मनोमिलनाआधीच राणेंनी उडवली ठाकरेंची खिल्ली
न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने असंही म्हटलं होतं की, 21 मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत खेडकरविरुद्ध कोणतेही सक्तीचे पाऊल उचलले जाणार नाही. फसवणूक प्रकरणात माजी आयएएस प्रोबेशनर पूजा खेडकरला (IAS) 2 मे रोजी दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा कोणताही ठोस तपास झाला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नमूद केलंय. दिल्ली पोलिसांना तपास जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
Cheating case against former IAS probationer Puja Khedkar: SC says no coercive steps shall be taken against her till May 21
— Press Trust of India (@PTI_News) April 21, 2025
सुनावणीदरम्यान, दिल्ली पोलिसांच्या वतीने उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी खेडकरची (Cheating Case) कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे सादर केले. सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला अंतरिम संरक्षण दिलंय.
मोठी बातमी : राज्यात खळबळ माजवणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेप
2022 च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या अर्जात आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा आरोप खेडकरवर आहे. तिने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, खेडकरविरुद्ध प्रथमदर्शनी एक मजबूत खटला असल्याचे आढळून आलं. व्यवस्थेत फेरफार करण्याचा मोठा कट उघड करण्यासाठी चौकशीची आवश्यकता आहे. स्थगिती दिल्यास प्रतिकूल परिणाम होईल, असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.
12 ऑगस्ट 2024 रोजी उच्च न्यायालयाने खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर नोटीस बजावली. तेव्हा तिला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आलंय. वेळोवेळी ही मुदत वाढविण्यात आली. खोटी ओळख दाखवून नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल यूपीएससीने खेडकर यांच्याविरुद्ध अनेक कारवाई सुरू केल्या, ज्यात फौजदारी खटला दाखल करणे समाविष्ट आहे. दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध विविध गुन्ह्यांसाठी एफआयआर देखील दाखल केलेली आहे.