मोठी बातमी : राज्यात खळबळ माजवणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेप

मोठी बातमी : राज्यात खळबळ माजवणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेप

Ashwini Bidre Assassination Case Verdict : अश्विनी बिद्रेच्या (Ashwini Bidre) हत्या प्रकरणी पननवे सत्र न्यायालाने मुख्य आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर, अन्य सहआरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने कुरूंदकरला जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच 20 हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे.

एपीआय अश्विनी बिद्रे हत्याकांड मागील नऊ वर्षांपूर्वी घडलं होतं. या हत्याकांडात पनवेल सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिलाय. त्यामध्ये पीआय अभय कुरूंदकर हे मुख्य दोषी असल्याचं म्हटलं होतं यावेळी न्यायालयाने हत्येमध्ये सहभागी असलेल्या (Panvel Court) महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना सुद्धा दोषी ठरवले आहे.

कालचक्र थांबवण्यासाठी 20 जूनला येतोय ‘समसारा’; सायली संजीव अन् ऋषी सक्सेना पुन्हा एकत्र

मागील 9 वर्षांपूर्वी म्हणजे 11 एप्रिल 2016 मध्ये API अश्विनी बिद्रे या गायब झाल्या होत्या. त्यानंतर तपासादरम्यान त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. तर (Ashwini Bidre Assassination Case) त्या गायब झाल्या, त्यादिवशी पीआय असलेल्या अभय कुरूंदकरला भेटायला गेल्या होत्या. तेव्हा भाईंदरला जात असतानाच कारमध्ये बिद्रे यांचा कुरूंदकरने गळा दाबून मारण्याचा प्रयत्नं केला. कुरूंदकर यात यशस्वी झाला अन् बिद्रे यांचा मृत्यू झालाय.

उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या एकीकरणाला कुणाचा विरोध; पक्षाच्या दुसऱ्या फळीच्या प्रतिक्रिया काय?

त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी कुरूंदकरने अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी कुरुंदकरच्या मृतदेहाचे लाकडं कापण्याच्या कटरने तुकडे केले. जेणेकरून ते फेकून देण्यास सोपे जातील. हे तुकडे त्यांनी वसईच्या खाडीमध्ये फेकले होते. मात्र, तपासादरम्यान जेव्हा हे अवशेष सापडले. त्यानंतर आजपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होत आहे.

सत्र न्यायालयाने आता एपीआय अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये पनवेल पीआय अभय कुरूंदकर हेच मुख्य दोषी असल्याचं म्हटलंय. यावेळी न्यायालयाने हत्येमध्ये सहभागी असलेल्या महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना देखील दोषी ठरवलं. तसेच करूंकरचा ड्रायव्हर राजेश पाटीलला मात्र न्यायालयाने दिलासा दिला. त्याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube