API अश्विनी बिद्रे हत्याकांडात मोठा निकाल! PI अभय कुरुंदकर हाच मुख्य दोषी; 11 एप्रिलला शिक्षा सुनावणार

PI Abhay Kurundkar is the main culprit in API Ashwini Bidre murder case : गेल्या 9 वर्षांपूर्वी घडलेल्या एपीआय अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये पनवेल सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. त्यामध्ये पीआय अभय कुरूंदकर हेच मुख्य दोषी असल्याचं म्हटलं आहे. यावेळी न्यायालयाने हत्येमध्ये सहभागी असलेल्या महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना देखील दोषी ठरवले आहे. या प्रकरणावर 11 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीत त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
काय आहे API अश्विनी बिद्रे हत्याकांड?
गेल्या 9 वर्षांपूर्वी म्हणजे 11 एप्रिल 2016 मध्ये API अश्विनी बिद्रे या गायब झाल्या होत्यानंतर तपासा दरम्यान त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. तर त्या गायब झाल्या त्यादिवशी पीआय असलेल्या अभय कुरूंदकरला भेटायला गेल्या होत्या. तेव्हा भाईंदरला जात असतानाच कारमध्ये बिद्रे यांचा कुरूंदकरने गळा दाबून मारण्याचा प्रयत्नं केला. तो यशस्वी झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.
भाजपचं ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्था, सदस्य नोंदणी अन् जिल्हाध्यक्ष; अहिल्यानगरचा अध्यक्ष कोण?
त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी अश्विनी यांच्य मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मृतदेहाचे लाकडं कापण्याच्या कटरने तुकडे केले. जेणे करून ते फेकून देण्यास सोपे जातील. हे तुकडे त्यांनी वसईच्या खाडीत फेकले. मात्र तपासा दरम्यान जेव्हा हे अवशेष सापडले. त्यानंतर आज पर्यंत या प्रकरणाचा उलगडा होत आहे.
मनसैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा! राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश; पत्रात नेमकं काय?
यावर आता एपीआय अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये पनवेल सत्र न्यायालयाने पीआय अभय कुरूंदकर हेच मुख्य दोषी असल्याचं म्हटलं आहे. यावेळी न्यायालयाने हत्येमध्ये सहभागी असलेल्या महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना देखील दोषी ठरवले आहे. तसेच करूंकरचा ड्रायव्हर राजेश पाटीलला मात्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. पुराव्या अभावी त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.