Rekha Jare Murder Case : सुप्रीम कोर्टाचा निर्णय! रेखा जरे खून प्रकरणात बाळ बोठेला जामीन मंजूर
Bal J. Bothe Patil यांना रेखा जरे हत्याकांड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 30 नोव्हेंबर 2020 रोज जरेंची हत्या झाली होती.

Supreme Court decision Advocate Bal J. Bothe Patil granted bail in Rekha Jare murder case : अहिल्यानगरच्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पत्रकार बाळ बोठे पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मागील 20 मार्च 2021 रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. रेखा जरेंच्या हत्येची सुपारी बोठे यांनी दिल्याचा आरोप आहे. 30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरेंची हत्या झाली होती.
नितीश कुमारांचा झटका चिराग पासवानांना झटका; 57 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर
नेमकं प्रकरण काय?
अहिल्यानगर शहरातील मोठ्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांना प्रेम संबंधाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपयांची वसुली केली जात असल्याचा प्रकरणाचा तपास उघड झाला होता. याच प्रकरणांमध्ये वापरण्यात आलेल्या हनिट्रॅप जाळ्याचा सुगावा लागला होता. यामध्ये संभाव्य कायदेशीर अडथळा टाळण्यासाठी झालेली रेखा जरी यांची हत्या राज्यभर गाजली होती.
30 नोव्हेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या असलेल्या रेखा जरे यांची पारनेर जवळील जातेगाव घाटात दोघांनी कार अडवून धारदार शास्त्रने गळा चिरून हत्या केली होती. त्यावेळी जरे यांच्या मुलाच्या मोबाईलमध्ये त्या हल्लेखोराचे छायाचित्र कैद झाले होते. यावरून तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी तात्काळ तपास करत दुसऱ्याच दिवशी श्रीरामपूर राहुरी इथून दोन संशयितांना बेड्या ठोकल्या होत्या. या दोघांच्या चौकशीमध्ये तिघांना अटक झाली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये मात्र बाळ बोटे यांचे नाव समोर आले आणि तो या हत्याकांडाचा मास्टर माइंड असतात ते स्पष्ट झालं होतं.