Ashwini Bidre Murder : काडीमोड घेत नव्या संसाराची स्वप्ने पाहिली पण त्याने वसईची खाडीच दाखवली…

API Ashwini Bidre Murder Case : पती, एक मुलगी आणि संसार सुरु असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होत ती पोलिस विभागात नोकरी करु लागली. लग्नानंतर काही वर्षांतच पत्नीला नोकरी मिळाल्याने पती-पत्नीचा सुखी संसार सुरु होता. नोकरीमधून पहिलीच पोस्टिंग पुण्यात मिळाली. त्यानंतर सांगलीला बदली झाली. सांगलीत सेटल होत पती-पत्नीचा संसार सुरु झाला खरा पण या सुखी संसाराची नजर लागली. दोघात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली अन् संसाराचा खेळ झाला. या खेळाचा शेवट वसईच्या खाडीत झाला. ही गोष्ट आहे कोल्हापुरच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे (API Ashwini Bidre) यांची.
पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांनी पीआय अश्विनी बिद्रे यांची गळा दाबत हत्या करुन मृतदेह वसईच्या खाडीत फेकल्याचं समोर आलं. या हत्याकांडाप्रकरणी अभय कुरुंदकरसह इतर दोघे दोषी असल्याचं आढळून आले आहेत. या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयात अभय कुरुंदकरसह इतर दोघांच्या शिक्षेवर आज सुनावणी पार पडली. शिक्षेवर आता येत्या 21 एप्रिलला सुनावणी पार पडणार आहे.
बजाज ऑटोचे माजी उपाध्यक्ष मधुर बजाज कालवश; वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अभय-अश्विनीच्या प्रेमकहाणीची सुरुवात कधी?
एकीकडे अश्विनी बिद्रेचा संसार सुरु होता तर दुसरीकडे पोलिस विभागाची नोकरी. नोकरी सुरु असताना तिची एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी भेट झाली. त्याचं नाव होतं. अभय कुरुंदकर. अभय कुरुंदकर हे पोलिस निरीक्षक होते. एकाच खात्यात नोकरी करताना दोघांचा एकमेकांशी जवळून संबंध येत असायचा. यातच दोघांची चांगली मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. दोघांचेही विवाहबाह्य संबंध सुरु असतानाच अश्विनीची सांगलीहुन रत्नागिरीला पोस्टिंग झाली. अश्विनीची ही तिसरी पोस्टिंग होती. दोघेही प्रेमाच्या दुनियेत वाहत असल्याने अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी थेट रत्नागिरी गाठत असे. दोघांमध्ये प्रेमाचे घट्ट नाते तयार झाले आणि अखेरीस दोघांनीही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांच्या या प्रेमसंबंधाची गोष्ट एक दिवस अश्विनीचा पती राजू गोरे यांना समजली. आपला पती प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याचं लक्षात येताच अश्विनीने 2014 साली आपल्या पतीपासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला.’
अभय-अश्विनी लिव्ह-इन रिलेशनमध्ये…
काडीमोड घेतल्यानंतर अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे दोघेही एकत्र राहू लागले. या दोघांच्या संबंधाबद्दल अश्विनीचा पती राजू गोरेला माहिती होती मात्र, अभय कुरुंदकरच्या पत्नीला आणि मुलांना प्रेमसंबंधाची भनक नव्हती. दोघेही एकत्रितपणे राहत असतानाही अश्विनी तिच्या मुलीला भेटण्यासाठी आपल्या पतीकडे जात असत. पुढे काही दिवसांनंतर तिने मुलीला भेटणंही बंद केलं. पुढे काही दिवसांनी अभय आणि अश्विनी नवी मुंबईतील एका परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्यावेळी अश्विनीने अभय कुरुंदकरकडे लग्नासाठी हट्ट धरला. मात्र, आपल्या इज्जतीला जपण्यासाठी कुरुंदकर अश्विनीशी लग्न करण्यात तयार नव्हता. यातूनच दोघांचे वाद-विवाद होत असतं. याच काळात अश्विनीला पोलिस विभागात प्रमोशन मिळालं आणि अश्विनी सहाय्यक पोलिस निरीक्षक बनली. अश्विनी दैनंदिन नोकरीसाठी स्वत:च्या दुचाकीवरुन ऑफिसला जायची. मात्र, 11 एप्रिल 2016 नंतर ती अचानक गायब झाल्याचं उघड झालं.
अभय कुरुंदकरने हत्या कशी केली?
ज्या दिवशी अश्विनी बिद्रे गायब झाली त्या दिवशी बिद्रे पीआय अभय कुरुंदकरला भेटण्यासाठी गेली होती. त्याचवेळी भाईंदरला जात असतानाच कारमध्ये बिद्रे यांचा कुरुंदकरने गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. कुरुंदकर यांनी बिद्रे यांचा गळा दाबल्याने त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी लाकड कापण्याच्या कटरने मृतदेहाचे तुकडे करुन वसईच्या खाडीत फेतून दिले. बिद्रे यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या तपासामध्ये त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले.