प्रीती सुदान UPSC च्या नव्या अध्यक्ष; मनोज सोनींच्या राजीनाम्यानंतर मिळाली नियुक्ती
Preeti Sudan new Chair Person of UPSC : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सध्या देशभरात चर्चेत आहे. याच आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी (Manoj Soni) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता. सन 2029 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर युपीएससीचा अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. 1983 बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना युपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
मोठी बातमी! UPSC अध्यक्ष मनोज सोनींचा राजीनामा; 2029 पर्यंत होती मुदत, टायमिंगने खळबळ
प्रीती सुदान उद्या आपल्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. एक महिना आधी तत्कालीन अध्यक्ष मनोज सोनी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. देशात पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित केले जात होते.
1983 batch IAS officer Preeti Sudan will be the new UPSC Chairperson, with effect from 1st August 2024. pic.twitter.com/t6Ylfr4BOP
— ANI (@ANI) July 31, 2024
त्यांच्या राजीनम्यानंतर प्रीती सुदान युपीएससीच्या नव्या अध्यक्ष असताल. सुदान 1 ऑगस्ट रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. सुदान सन 2022 पासून युपीएससीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांना अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आयुष्मान भारत या योजना सुरू करण्यासह राष्ट्रीय चिकित्सा आयोग, संबद्ध स्वास्थ्य पेशेवर आयोग आणि ई सिगरेट प्रबंधन संबंधी कायदे बनविण्यात त्यांनी योगदान दिले आहे.
कोण आहेत प्रीती सुदान?
प्रीती सुदान या आंध्र प्रदेश कॅडरच्या (1983) सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ जुलै 2020 मध्ये संपला होता. महिला आणि बालविकास मंत्रालयासह त्यांनी रक्षा मंत्रालयातही काम केलं आहे. सुदान या त्यांच्या कॅडर राज्य आंध्र प्रदेशात अर्थ, योजना, आपत्ती निवारण, पर्यटन आणि कृषी विभागांच्या प्रभारी राहिल्या आहेत. सुदान यांनी जागतिक बँकेसाठी सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
MPSC Exam: एमपीएससीतही पूजा खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती? निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रार
पूजा खेडकर प्रकरणात UPSC ची चर्चा
युपीएससी सध्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आहे. आयएएस 2023 बॅचच्या अधिकारी पूजा खेडकर पुण्यात प्रशिक्षणा दरम्यान वादात सापडल्या होत्या. या काळात अधिकारांचा गैरवापर आणि परीक्षेत बोगस कागदपत्रांच्या वापराचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) गुन्हा दाखल केला आहे. नाव बदलून परीक्षा देणे, आयोगाची फसवणूक करणे अशा आरोपांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय तुमची निवडच का रद्द करु नये, याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राथमिक चौकशीनंतर आयोगाने खेडकर यांच्यावर ही कारवाई केली आहे.