UPSC 2023 टॉपर आदित्य श्रीवास्तवने आधी आयपीएस आता आयएएसला कशी घातली गवसणी?

UPSC 2023 टॉपर आदित्य श्रीवास्तवने आधी आयपीएस आता आयएएसला कशी घातली गवसणी?

UPSC CSE 2023 Result : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ( UPSC ) घेण्यात आलेल्या परीक्षांचे (युपीएससी 2023) अंतिम निकाल ( Result) जाहीर झाले आहेत. यामध्ये आदित्य श्रीवास्तव ( Aditya Shrivastav ) हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. मात्र त्याचा हा आयपीएसवरून आयएएस होण्याचा प्रवास कसा राहिला आहे. त्याने अभ्यास कसा केला जाणून घेऊ सविस्तर…

माझ काय वय झालं का? म्हणणारे शरद पवार प्रचाराच्या मैदानात! महाराष्ट्रभर सभांचा धडाका

आदित्यने आपलं सुरुवातीचे शिक्षण लखनऊमधील सीएमएस अलीगंज या ठिकाणी पूर्ण केलं. त्यानंतर त्याने आयआयटी कानपूर या ठिकाणहून बीटेक आणि एमटेकचं शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने 15 महिने बेंगळूर या ठिकाणी अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी देखील केली. मात्र 2020 मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायला लागला. 2022 मध्ये त्याला पहिल्यांदा यूपीएससीमध्ये यश मिळालं. तेव्हा त्याला 236 वी रँक मिळाली होती. त्यावेळी तो आयपीएस झाला.

Salman Khan Firing Case: बिश्नोई ब्रदर्सला का करायचाय सलमानचा गेम?

मात्र आयपीएस होऊन देखील आदित्यचं स्वप्न पूर्ण झालेलं नव्हतं. त्यामुळे आयपीएसचं पोस्टिंग मिळाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ट्रेनिंग घेत असताना देखील त्याने यूपीएससीचा अभ्यास सुरूच ठेवला. आदित्यच्या या यशामागील आणखी एक विशेष म्हणजे त्याने कुठल्याही कोचिंग शिवाय हे यश प्राप्त केला आहे.

‘सासुचे चार दिवस संपलेत आता सुनेचे येऊ द्या ना’; अजितदादा बेंबीच्या देठापासूनच ओरडले

त्याने टेस्ट सिरीज आणि मॉक इंटरव्यू यातून या परीक्षेची तयारी केली. तर वैकल्पिक विषय म्हणून त्याने इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग निवडलं होतं. कारण त्याचं बी टेकचे शिक्षण देखील याच विषयातून झालं होतं. त्याच्या अभ्यासाच्या पद्धतीबद्दल सांगायचं झालं तर गेल्या वर्षीपासून त्याने 2023 च्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली होती. यामध्ये त्याने पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची तयारी केली. प्रत्येक विषयांचे प्रत्येक टॉपिकचे नोट्स काढले आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्याने युपीएससी क्रॅक केली.

त्याच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर तो जेव्हा आयपीएसचं पोस्टिंग मिळाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ट्रेनिंग घेत होता. त्याचवेळी त्याचे वडिल अजय श्रीवास्तव हे सेंट्रल ऑडिट डिपारमेंटमध्ये एएओ या पदावर कार्यरत आहेत. आदित्यची लहान बहीण नवी दिल्ली या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे तर आई एक गृहिणी आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज