Talathi Result : तलाठी भरतीचा सावळागोंधळ, उमेदवाराला मिळाले २०० पैकी २१४ गुण

Talathi Result : तलाठी भरतीचा सावळागोंधळ, उमेदवाराला मिळाले २०० पैकी २१४ गुण

Talathi Recruitment Result : गेल्या काही दिवसांपासून तलाठी भरतीच्या निकालाची अनेक जण वाट पाहत होते. दरम्यान, बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेचा निकाल ५ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. तर याआधी भूमी अभिलेख विभागाने डिसेंबर महिन्यात अंतिम उत्तरतालिका जाहीर केली होती. यापूर्वी 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. दरम्यान, तलाठी भरतीचा निकाल येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) निकालावर आक्षेप घेतला आहे.

राज्यात मराठा-ओबीसी वाद घडवला जातोय; आरक्षणाच्या वादात राज ठाकरेंचीही उडी 

निकालामध्ये प्रचंज गोंधळ झाला असून जुन्या परीरक्षेत अनुत्तीर्ण झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती केला आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर याआधी गुन्हे दाखल झाले आहेत ते परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

तुम्हीच एकमेकांना मान दिला नाही तर लोकं काय… राज ठाकरेंच्या कलाकारांना कानपिचक्या! 

स्पर्धी परीक्षा समन्वय समितीने ट्वीटरवर एक पोस्ट लिहिली. त्यात म्हटलं की, दोन निकाल एकाच व्यक्तीचे आहेत. परीक्षांमध्ये केवळ 15 दिवसांचा गॅफ असेल. वनरक्षक मध्ये 54 गुण आणि तलाठीमध्ये 200 पैकी 214 गुण घेऊन टॉप केलं आहे. यावरून समजून जावे की, पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. ९९ टक्के जागा विकल्या गेल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी करावी. याशिवाय या सर्व मुलांनी कोणत्या केंद्रावरून पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहे, हे सर्वांना समजलं पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळआ हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे, असा आरोप केला आहे.

समन्नय समितीनं लिहिलं की, तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचं आमचं आधीपासूनच मत आहे. निकालानंतर त्याचं दुजोरा मिळतांना दिसतो आहे. तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी पेपरफुटीचे गुन्हे दाखल आहेत, अशा बऱ्याच मुलांना १९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चरित्र प्रमाणपत्र वाटून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखऊन दुसऱ्या पदावर नोकरी करत आहे. त्यामुळं या सर्व प्रकारची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

तलाठी भरतीत घोटाळा झाला, हे आम्हाला आधीच माहीत होते. त्यामुळेच आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याबाबत PIL दाखल केली आहे. लवकरच रिट पीटिशन दाखल होईल, असंही स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज