राज्यात मराठा-ओबीसी वाद घडवला जातोय; आरक्षणाच्या वादात राज ठाकरेंचीही उडी

राज्यात मराठा-ओबीसी वाद घडवला जातोय; आरक्षणाच्या वादात राज ठाकरेंचीही उडी

Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मिळावं, अशी मागणी केली. मात्र, ओबीसींनी या मागणीला विरोध केल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha vs OBC) हा संघर्ष पेटला आहे. दरम्यान, यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंन (Raj Thackeray) भाष्य केलं. महाराष्ट्र एकसंध राहू नये, यासाठी कोणीतरी हे सर्व घडवून आणतंय, असं मोठं विधान त्यांनी केलं.

तुम्हीच एकमेकांना मान दिला नाही तर लोकं काय… राज ठाकरेंच्या कलाकारांना कानपिचक्या!

आज शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात ख्यातनाम अभिनेते दीपक करंदीकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलतांना राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, आपल्या परिवर्तनवादी महाराष्ट्राने देशाचं प्रबोधन केलं. देशाला दिशा दिली. प्रत्येक विचारसरणीचा उगम महाराष्ट्रात झाला आहे. मात्र, आज तोच महाराष्ट्र अंधारात चाचपडत आहे, हे मोठी शोकांतिका आहे. आज राज्यात जातीपातीत भांडणं लावली जात आहे. आपला महाराष्ट्र जातीपातीत बरबरटून गेला.सध्या जो काही मराठा विरुध्द ओबीसी वाद सुरू आहे, ते सगळं मुद्दाम कोणीतरी घडवतं आहे. याचा हेतू फक्त महाराष्ट्र एकसंध राहू नये, एवढाच आहे. त्यासाठीच जातीपातीत संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

तुम्हीच एकमेकांना मान दिला नाही तर लोकं काय… राज ठाकरेंच्या कलाकारांना कानपिचक्या! 

देशात कितीतरी चॅनेल, सोशल मीडिया, पक्ष, नेते त्यासाठी काम करत आहेत. महाराष्ट्राचं एकत्रिकरण, एकसंधपणा मोडीत काढण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. मात्र, आपल्या राज्यातले नेते मंडळी सत्तेच्या मश्गूल आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत
आपण ज्याला इतिहास म्हणतो, तो संपूर्ण इतिहास हा भूगोलावर आधारीत असतो. भूगोल म्हणजे, जमीन. जमीन ताब्यात घेणं, भूगोल काबीज करण्यासाठी ज्या लढाया झाल्या, त्याला इतिहास म्हणतात. आणि आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून घेतली जायची. आज तुम्हालाही कळणार नाही इतक्या चालाखीने विकत घेतली जाते. तुमच्या भाषेवर अतिक्रमण सुरू आहे. तुमच्या संस्कृतीवर अतिक्रमण सुरू आहे. आपण आपली भाषाही हरवतच चाललोय, असं ठाकरे म्हणाले. त्यामुळं चारही बाजूला मराठी माणसांचं लक्ष असलं पाहिजे.

सगळे फोनवर आणि देश व्हेंटीलेटवर
१९९५ आधी आणि १९९५ नंतर चा महाराष्ट्र वेगळा आहे. १९९५ नंतर राजीव गांधींनी संगणक आणला. त्यामुळं जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडे झाले. मात्र, मोबाईल, इंटरनेट, टीव्ही चॅनेल यातच आपला समाज अडकून पडला. सगळे फोनवर आणि देश व्हेंटीलेटवर अशी परिस्थिती झाली, असंही राज ठाकरे म्हणाले. आता मध्यमवर्गाने पुढचं पाऊल टाकलं पहजे. राजकारण, संस्थामध्ये उडी घेतली पाहिजे. आज केवळ सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञ असावं लागलतं. सुज्ञ लोकांची देशाला राज्याला गरज आहे, असं ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज