‘लता मंगेशकरांवर लवकरच पुस्तक आणणार’; राज ठाकरेंनी केली घोषणा
Raj Thackeray News : गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर लवकरच पुस्तक काढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पुण्यात पार पडलं. या नाट्यसंमेलनात राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी ही घोषणा केली आहे.
लोकसभेला कोणत्या राज्यात किती जागा लढवायच्या? काँग्रेसचा गोपनीय अहवाल बाहेर! ‘इंडिया’त बिनसणार?
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, लता मंगेशकर यांनी पहिल्या भेटीपासूनच माझ्यावर मुलासारखंच प्रेम केलं आहे. मला त्यांचा पहिला फोन आला होता, तेव्हा मी लता बोलत असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्यावर कोण लता असा सवाल मी केला होता, त्यावर त्यांनी मी लता मंगेशकर बोलत असल्याचं सांगितलं असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
पहिल्यांदा फोनवर संभाषण झाल्यानंतर मी त्यांच्या भेटीला गेलो होते. तेव्हा मंगेशकरांच्या पहिल्या भेटीनंतर अनेक कार्यक्रमात आम्ही भेटलो. एका कार्यक्रमात मला जाणवलं की, त्या कार्यक्रमात वाद्य सुरु असताना त्यांचा शार्प आवाज घुमायचा. लतादीदींचा इतका शार्प आवाज मी कधीच ऐकला नव्हता, असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
खासदार नवनीत राणा सहा महिन्यात जेलमध्ये दिसतील, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
एकदा लतादीदींना भेटण्यासाठी गेलो होते तेव्हा मी विचारलं की, मी लतादीदींना विचारलं की, तुम्ही ही गाणी अशी का लिहुन काढली. त्यावर दीदींनी सांगितलं की, हे जुन्या काळातील कवींनी उर्दूत लिहुन ठेवलेली गाणी आहेत. त्यातील अक्षरे समजत नाहीत. ही गाणी संगीतकारांनी सांगितल्यानंतर मी माझ्या अक्षरात लिहुन गाणं म्हणताना कोणत्या शब्दांवर अधिक जोर द्यायचा त्यावर काम करत असल्याचं लतादीदींनी सांगितलं असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
ही जुनी कवींची गाणे पाहुन त्यावर पुस्तक लिहिण्याबाबत लतादीदींना सांगितलं होतं. त्यानंतर लतादीदींनी माझ्याकडे तो गठ्ठा सोपवून मला पुस्तक लिहिण्याबद्दल पाठबळ दिलं होतं. त्यानंतर मी पुस्तकाचा कव्हर त्यांना दाखवला. हे फक्त तूच करु शकतोस, असं म्हणत मला शाब्बासकी दिल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
माझ्यात कलाकारांच्या जिवंत म्हणूनच कलाकार येतात…
कलाकार तुमच्याकडेच का येतात? असा सवाल राज ठाकरेंना या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ठाकरे म्हणाले, कलावतं आणि कला यांच्या जाणीवा माझ्यात जिवंत आहेत. जो कलाकार माझ्याकडे येतो मी त्यांच्या चप्पलेत पाय घालतो. एकदा एक मुलगा आणि त्याची आई माझ्याकडे आले होते, तेव्हा मुलगा बोलताना मला तो मीच बोलत असल्याचं जाणवलं आणि माझ्यासोबत आई असल्याचं जाणवलं, असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितला आहे.