‘सासुचे चार दिवस संपलेत आता सुनेचे येऊ द्या ना’; अजितदादा बेंबीच्या देठापासूनच ओरडले

‘सासुचे चार दिवस संपलेत आता सुनेचे येऊ द्या ना’; अजितदादा बेंबीच्या देठापासूनच ओरडले

Ajit Pawar On Sharad Pawar : सासुचे चार दिवस संपलेत आता सुनेचे चार दिवस येऊ द्या ना, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बेंबीच्या देठापासूनच शरद पवार (Sharad Pawar) यांना सुनावलं आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुनेला निवडून द्या, असं आवाहन केलं, त्यावर शरद पवारांनी मूळ पवार अन् बाहेरचे पवार असा टोला लगावला होता. शरद पवारांनी टोला लगावल्यानंतर आज अजितदादांनीही शरद पवारांना कडक शब्दांत सुनावलं आहे. बारामतीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

१५ वर्षात काय कामे केली, त्यांना विकास निधीही आणता आला नाही; अजित पवारांची सुळेंवर निशाणा

अजित पवार म्हणाले, जुना काळ आठवतं असेल तर आता जुनं बाजूला ठेवा आता नवीन काळ बघा.. सासुचे चार दिवस संपलेत आता सुनेचे चार दिवस येऊ द्या, असं सांगा ना. कायम सासू..सासू..सासू..सासू…सुनेने काय नुसतं बघत बसायचं का? बाहेरची…बाहेरची…बाहेरची..असं कुठं असता का? असा थेट सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना केला आहे. तसेच सुनेकडे आपण घरची लक्ष्मी म्हणून पाहतो. चाळीस वर्षे झाली तरी बाहेरची मग किती वर्षे झाल्यावर घरची सांगा? असंही अजितदादांनी थेट विचारलं आहे.

आयुष्मान खुरानानं लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेला दिली भेट, फोटो व्हायरल

काय म्हणाले होते शरद पवार?
अजित पवार यांनी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवार यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यामध्ये चुकीचं काही नाही. मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, असा खोचक टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला होता.

शरद पवारांचं स्पष्टीकरण :
मी तसं बोललो नव्हतो. अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, मला (अजित पवारांना) निवडून दिलं. ताईंना (सुप्रिया सुळेंना) निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या. पुढं त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं. त्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरणं केलं. त्याचा वेगळा अर्थ काढायची गरज नव्हती, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी या विधानानंतर दिलं होतं.

दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीवरुन शरद पवार आणि अजित पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांवरही शरद पवार गटाकडून सडकून टीका केली जात आहे. आता अजितदादांनी सुनावल्यानंतर शरद पवार नेमकं काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज