जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी ; अजितदादांनी थेट तारीखच सांगितली

ZP Election : नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीनंतर सध्या राज्यात 29 महापालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु असून राज्यातील राजकारण

ZP Election

ZP Election : नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीनंतर सध्या राज्यात 29 महापालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु असून राज्यातील राजकारण तापले आहे. 29 महापालिका निवडणुकीसाठी राज्यात 15  जानेवारी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे आता राज्यात मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांसाठी लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी जाहीर होऊ शकतात याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे. महापालिका निवडणुका झाल्यानंतर राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आचारसहिंता लागू होणार अशी माहिती अजित पवार यांनी कोरेगाव- भीमा येथील 208 व्या शौर्य दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना दिली.

या कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, आज मी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. थंडी खूप आहे. सर्व निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. महापालिका निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे आचारसंहिता आहे. सध्या राज्यात महापालिकेच्या आचारसंहिता सुरु आहे असं अजित पवार म्हणाले.

तर या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) शिंदे शिवसेना (Shinde Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र निवडणूक लढवणार असून याबाबत उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असं देखील अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. आचारसंहितेमुळे कुठली अडचण निर्माण होईल ती होता कामा नये. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबाबतचा निर्णय घेईल. विदर्भातील जिल्हा परिषद उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कोकणातील जिल्हा परिषद कोकणातील जिल्हा परिषद पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत. ते आरक्षण 50 टक्के पर्यंतच घ्या अशा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहेत.

8th Pay Commission आजपासून लागू; पगारात होणार बंपर वाढ, जाणून घ्या किती वाढणार?

पन्नास टक्केच्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर दुसरीकडे राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदार होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

follow us