पुण्यात राजकीय पक्ष गुंडांना पोसणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आंदेकर अन् मारणेंना उमेदवारी
पुणे मनपात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि सोनाली आंदेलकर व लक्ष्मी आंदेकरला उमेदवारी दिली.
आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. (Pune) पुण्यात भाजपा शिवसेना युती होणार की, नाही हे अजून स्पष्ट झाले नाहीये. सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असून अजूनही एबी फॉर्मचे वाटत करण्यात आले नाही. गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आंदेकर कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबात अनेक तर्क- वितर्क लढवले जात होते. अखेर आज एबी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
Election LIVE Update : शिंदेंच्या आदेशाने पुण्यात आलोय; युतीचा काडीमोड? सामंत काय म्हणाले?
त्याचबरोबर जयश्री मारणे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक 10 मधुन उमेदवारी अर्ज भरणार आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जयश्री मारणेला एबी फॉर्मचे वाटप करण्यात आलं. जयश्री मारणे प्रभाग क्रमांक 10 मधुन निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गजा मारणेच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने अनेकांना धक्का बसला.
दुसरीकडे गुंड आंदेकरही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. गजा मारणे सध्या तुरूंगात असून त्याची पत्नी थेट महापालिका निवडणूक लढवत आहे. आता गुंडाना राजकीय पक्ष मोठ करणार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करणार अशीच चर्चा सध्या नागरिकांमध्ये आहे.
