मिनी मंत्रालयांचा बिगुल वाजणार! कसा असणार जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम

ZP and Panchayat Samiti Election चा बिगुल वाजणार आहे. यावर राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

ZP And Panchayat Samiti

Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Program will be Declare soon : राज्यामध्ये एकीकडे महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच आता नववर्ष सुरू होताच राज्यातील मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी देखील राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार हा निवडणूक कार्यक्रम कसा असू शकतो जाणून घेऊ…

उत्तरेतील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासांत थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांमध्ये आरक्षण काढताना पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निवडणूक थांबवलेली आहे. मात्र ज्या ठिकाणी आरक्षणाच्या मर्यादेचे पालन करण्यात आलेला आहे त्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 12 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांपैकी एकशे पंचवीस पंचायत समिती यांचा निवडणूक कार्यक्रम पुढील 21 दिवसात संपवण्यात येणार आहे.

अजित पवारांची ‘ती’ मागणी अन् दोन्ही राष्ट्रवादीची युती फिस्कटली! नेमकं काय घडलं?

यामध्ये सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती, संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. हा निवडणूक कार्यक्रम 8 ते 10 जानेवारी दरम्यान जाहीर केला जाऊ शकतो. त्यामध्ये 10 ते 17 जानेवारी उमेदवारी अर्ज भरणे 18 ते 20 जानेवारी अर्जांची छाननी आणि माघार, 21 जानेवारी चिन्ह वाटप, 30 जानेवारी मतदान, आणि 31 जानेवारी रोजी मतमोजणी होण्याची शक्यता आहे.

शनी आणि चंद्राच्या विष योगाने उलथा पालथीचे संकेत! जाणून घ्या बाराही राशींचे राशी भविष्य…

दुसरीकडे ज्या ठिकाणी आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन करण्यात आलेलं आहे. त्यावर 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होणार आहे. त्यामध्ये यावर काय निर्णय होतो? यावर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.

 

follow us