UPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅडर वाटप; राज्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेसाठी सज्ज
UPSC Cadre Allocation : गेल्या काही दिवसांपू़र्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहिर करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता या विद्यार्थ्यांना त्यांचे कॅडर वाटप झाले. त्याची महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॅडरची जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. (UPSC Cadre Allocation Maharashtra Sarthi Institutes students got Cadre )
आसामचे पोलीस अधिकारीच सुरक्षित नाहीत, मॉर्निंग वॉक दरम्यान DIG चा मोबाईल पळवला
सारथी संस्थेच्या विद्यार्थ्याला कोणते कॅडर मिळाले?
या यादीमध्ये सारथी या संस्थेच्या 17 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी आयएएस (IAS) -2, आयपीएस (IPS)-6, इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS)-1, दादारा आणि नगर हवेली नागरि सेवा-1, आयआरएस (IRS)- 2, आयसीएएस- 1, आय आरएमएस- 1 तर अद्याप 3 विद्यार्थ्यांचे कॅडर जाहीर झालेले नाही.
‘ते दुसऱ्यांवर आकडा लावतात’; राऊतांची भाजप अन् अजितदादांवर टोलेबाजी
तर सारथी या संस्थेच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदर करण्यात आलं. त्यात सारथीचे दोन विद्यार्थी आयएएस (IAS) झाले आहेत, सहा विद्यार्थी आयपीएस (IPS) झाले आहेत, एक विद्यार्थी इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) व दोन विद्यार्थी आयआरएस (IRS) झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे सारथी या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये UPSC ची मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी-मे 2023 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील 70 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकूण यशस्वी झालेल्या 933 विद्यार्थ्यांपैकी 12 टक्के विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत.