UPSC CSE Result : ‘यूपीएससी’चे निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात टॉपर; अनिमेष प्रधान द्वितीय

UPSC CSE Result : ‘यूपीएससी’चे निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात टॉपर; अनिमेष प्रधान द्वितीय

UPSC CSE 2023 Result : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचे (युपीएससी 2023) अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये आदित्य श्रीवास्तव हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. तर अनिमेश प्रधानने द्वितीय तर दोनुरू अनन्या रेड्डी हीने तिसरी रँक मिळवली आहे. पीके सिद्धार्थ राजकुमार चौथ्या तर रुहानीने पाचवी रँक मिळवली. सृष्टी डबास सहाव्या, अनमोल राठोडने सातवी, आशिष कुमारने आठवी, नौशीनने नववी तर ऐश्वर्यम प्रजापतीने दहावी रँक मिळवली.

आयएएस, आयएएफएस आणि आयपीएसह 1143 पदांसाठी एकूण 1016 विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 347, ईडब्ल्यूएस 117, ओबीसी 303, एससी 165 तर एसटी प्रवर्गातील 86 उमेदवारांचा समावेश आहे. नोटिफिकेशनुसार 355 उमेदवारांचा निकाल प्रोविजनल ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त युपीएससी सिव्हिल सर्व्हिस रिजल्ट 2023 रिजर्व लिस्टमध्ये एकूण 240 उमेदवारांची नावे आहेत. 355 उमेदवारांची नावे प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात आली आहेत.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांना भुलविणाऱ्या UPSC कोचिंग इस्टिट्यूट्सचा बाजार उठणार

कसा पाहता येईल निकाल?

upsc.gov.in या वेबसाइटवर UPSC CSE Results या लिंकवर क्लिक करा. लॉग इन तपशील भरल्यानंतर निकाल स्क्रिनवर दिसेल. निकालपत्र डाऊनलोड करण्याचाही पर्याय येथे उपलब्ध आहे.

2023 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवेसह अन्य टॉप क्लास सेवांमध्ये किती पदांवर नियुक्ती होणार आहे याची यादी दिली गेली आहे. यामध्ये आयएएस 180, आयपीएस 200, आयएफएस 37, सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप ए 613, ग्रुप बी सर्व्हिसेस 113 अशी संख्या आहे.

प्राध्यापकाला UPSC चा ध्यास, अपयशानंतर अंगावर थेट वर्दी; IPS संदीप गिल यांचा प्रेरणादायी प्रवास

याआधी सन 2021 मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली होती. परंतु, यंदा मात्र मुले टॉपर ठरली आहेत. याआधीच्या परीक्षेत अंकिता अग्रवाल व जेमिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला होता. 2022 मधील परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube