Telegram CEO चं अजब रेकॉर्ड! लग्न न करताच 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप, विकी डोनर चित्रपटाशी कनेक्शन?

Telegram CEO चं अजब रेकॉर्ड! लग्न न करताच 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप, विकी डोनर चित्रपटाशी कनेक्शन?

Telegram CEO Biological father of 100 children : अनाथ मुलांना दत्तक घेऊन किंवा त्यांचा आर्थिक खर्च उचलून अनेकांनी कित्येक मुलांचं पालकत्व स्वीकारल्याचं आपण अनेकदा ऐकतो. मात्र टेलिग्राम (Telegram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मालकाने (CEO) एक अजब रेकॉर्ड केलं आहे. ते म्हणजे ते लग्न न करता 12 देशांमधील तब्बल 100 मुलांचे बायोलॉजिकल वडील (Biological father) झाले आहेत. हे ऐकून आजच्या काळात कुणाचाही विश्वास बसणार नाही. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे? त्याचा विकी डोनर चित्रपटाशी काय कनेक्शन? पाहूयात…

पिपाडांची एक घोषणा अन् विखेंना टेन्शन; शिर्डीसाठी रणशिंग फुंकलं…

पावेल दुरोव असं या टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मालकाचं नाव आहे. त्याने नुकतीच टेलिग्रामवर एक पोस्ट केली. ज्यामध्ये त्याने हा धक्कादायक दावा केला की, आपण एक दोन नाही तर चक्क 100 मुलांचे बायोलॉजिकल वडील आहोत. मात्र त्याची ही मुलं 12 देशांमध्ये त्याने केलेल्या स्पर्म डोनोशनमधून जन्माला आली आहेत.

Telegram CEO post

Telegram CEO post

तसेच या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की, जे लोक आई-वडील होऊ शकत नाही किंवा त्यांना काही अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी अशा प्रकारे मदत करणं गरजेचे आहे. मला देखील नुकतंच कळालं की, मी अशाच प्रकारच्या मदतीतून तब्बल 100 मुलांचा बायोलॉजिकल बाप झालो आहे. तसेच ही गोष्ट मी लग्न न करता करू शकलो आहे. त्यामुळे जे लोक लग्न न करता एकट राहू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक समाधानाची बाब आहे. असंही पावेल म्हणतात.

Government Schemes : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येणार?

आपल्या या स्पर्म डोनेशनबद्दल सांगताना ते म्हणतात, पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पावेल यांच्या एका मित्राला मूल होण्यामध्ये अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याने पावेलला त्यांचं स्पर्म डोनेट करण्याची विनंती केली. पावेल जेव्हा क्लिनिकमध्ये गेले. त्यावेळी तेथे त्यांचं स्पर्म उत्तम दर्जाचं असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी त्यांचं स्पर्म डोनेट केलं. आता त्यांनी हे डोनेशन बंद केलं असलं तरी देखील अगोदर केलेल्या डोनेशन मधूनच ते तब्बल 100 मुलांचे बॉयोलॉजिकल वडिल आहेत.

दरम्यान 2012 साली आलेला बॉलीवूडचा चित्रपट विकी डोनर हा देखील स्पर्म डोनेशन याच विषयावर आधारित चित्रपट होता. ज्यामध्ये अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री यामी गौतम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता जॉन अब्राहम याने केली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या एका मित्राच्या आयुष्यात घडलेला स्पर्म डोनेशनसंदर्भातील प्रसंग दाखवला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube