Pooja Khedkar : ‘जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी…’, IAS पूजा खेडकरांनी स्पष्टच सांगतिले
Pooja Khedkar: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) चर्चेत आहे. सध्या त्यांच्यावर रोज नवनवे आरोप होत असल्याने दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
पूजा खेडकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे तर दुसरीकडे पूजा खेडकर यांच्याबरोबर त्यांचे वडील आणि आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे आज पूजा खेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना मीडियावर खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जे काही सत्य आहे ते लवकरच समोर येईल. मी काहीच लपवलेलं नाही, समितीशी जो संवाद साधला जातो त्याची गुप्तता ठेवली जाते. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी समिती करत आहे. माझ्याकडे जी काही कागदपत्रं, माहिती होती मी त्यांना दिली आहे. समिती लवकरच निर्णय घेईल तो पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल असं माध्यमांशी बोलताना पूजा खेडकर म्हणाल्या.
माझ्याबद्दल दररोज नव्या फेक न्युज समोर येत आहे. असा कोणता व्यक्ती असतो ज्याचं रोज काही नवीन असतं? माझ्याबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. माझी फार मानहानी होती आहे. मीडियाने जबाबदारीने वागायला हवं. मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे फेक न्यूज पसरवू नका असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
चौकशी दरम्यान जी काही माहिती मिळते त्यात काही छेडछाड होऊ नये यासाठी ती जाहीर केली जात नाही. तसेच त्यामध्ये कोणीही मध्यस्थीचा प्रयत्न करु नये यासाठी देखील माहिती दिली जात नाही. जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी स्वतः तुम्हाला त्याची कॉपी देईन. असंही यावेळी त्या म्हणाल्या. याच बरोबर माझ्या घरी पोलीस आले नव्हते, मी त्यांना बोलावलं होतं. माझं त्यांच्याकडे काम होतं. तसेच पोलिसांनी कोणत्याही तपास केला नाही असा दावा देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
नेमकं प्रकरण काय ?
पूजा खेडकर यांनी ओबीसी आणि अपंगत्वाच्या तरतुदींचा गैरवापर यूपीएससी परीक्षेमध्ये स्थान मिळवण्यासाठी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. तसेच त्यांनी अहमदनगर शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र मिळवला अशी देखील माहिती समोर आली आहे.
‘संशय असेल तर मतपत्रिका चेक करा,’ हिरामण खोसकरांनी सांगितलं आमदार फुटीचा सर्व घटनाक्रम
सध्या या प्रकरणात सरकारने गठीत केलेली समिती चौकशी करत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे त्याचा अहवाल पाठवल्यावर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर यांची बदली झाली आहे.