‘संशय असेल तर मतपत्रिका चेक करा,’ हिरामण खोसकरांनी सांगितलं आमदार फुटीचा सर्व घटनाक्रम

‘संशय असेल तर मतपत्रिका चेक करा,’ हिरामण खोसकरांनी सांगितलं आमदार फुटीचा सर्व घटनाक्रम

Hiraman Khoskar : लोकसभेनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीवर लागले होते. 12 जुलैला या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत महायुतीच्या (Mahayuti) सर्व उमेदवारांना विजय मिळाला. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद समोर येत आहे.

काँग्रेस (Congress) पक्षाचे 7-8 आमदार फुटल्याने महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या त्या 7-8 आमदारांमध्ये हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांचा देखील नाव असल्याची चर्चा आहे. तर आता या प्रकरणात काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मोठा खुलासा करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

माध्यमांशी बोलताना हिरामण खोसकर म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत माझ्यासह सात आमदारांना महाविकास आघाडीचे उमेदवार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्याचे सांगतिले होते, त्यानुसार आम्ही मत दिले आहे. पण महाविकास आघाडीचे दुसरे उमेदवार शेकाप नेत जयंत पाटील (Jayant Patil) यांना ज्या 6 आमदारांनी मतदान केलं त्यांची मतं फुटली आहे. मात्र यावर पक्षश्रेष्ठी काहीच बोलत नाही, तिथे बोलण्याची वरिष्ठांची ताकद नाही, त्या सहा जणांवर कारवाई का होत? असा सवाल माध्यमांशी बोलताना आमदार हिरामण खोसकर यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना खोसकर म्हणाले, या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांना 23 मतं मिळणार होती मात्र त्यांना 22 मतं मिळाली. नार्वेकर यांना नाना पटोले, के सी पाडवी यांच्यासह सात जणांनी मतदान केले आहे, मी मराठीत मतदान केले आहे. जर कोणाला माझ्यावर संशय असेल तर माझी मतपत्रिका कोर्टाच्या ऑर्डर घेऊन चेक करा. मी मराठीत मतदान केलं आहे. त्यामुळे माझी मतपत्रिका लगेच सापडेल. आणि जर मी दोषी असेल तर माझी पक्षातून हकालपट्टी करा मात्र माझी बदनामी थांबवा. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना माहिती आहे की ते सहा जण कोण आहे. मी चौकशीला सामोरे जाणार असं देखील खोसकर म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा! ‘त्या’ प्रकरणात क्लीन चीट, वाचा सविस्तर

तसेच मागणी विधान परिषद निवडणुकीत माझ्याकडून कळत नकळत चूक झाली होती ती मी मान्य देखील करून याची माहिती वरिष्ठांना दिली असा खुलासा देखील यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube