मराठा आरक्षण बैठकीला दांडी; जरांगेंनी सत्ताधारी अन् विरोधकांना नॉनस्टॉप धुतलं

मराठा आरक्षण बैठकीला दांडी; जरांगेंनी सत्ताधारी अन् विरोधकांना नॉनस्टॉप धुतलं

Manoj Jarange News : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच गाजत आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारल्याचं दिसून आलं. या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱी आणि विरोधकांना नॉनस्टॉप धुतलंय. विरोधकांना मराठा आरक्षण बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केलायं. ते बीडमध्ये शांतता रॅलीमधून बोलत होते.

पोर्श कार अपघात प्रकरणात अमितेश कुमारांवर काय कारवाई होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मनोज जरांगे म्हणाले, सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन बैठक बोलावली होती. या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारलीयं. विरोधक नेत्यांना बैठकीला जाण्यासाठी काय रोग आला होता. त्यांनी बैठकीला जात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली पाहिजे होती. महाविकास आघाडीला मराठ्यांची मते घ्यायला गोड लागतं, असा खोचक टोला मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीला लगावलायं.

लंडनहून आणलेली वाघनखे छत्रपती शिवरायांचीच…; मुनगंटीवारांची विधानसभेत माहिती

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते बैठकीला आले नाहीत, अशी कारणे सत्ताधारी महायुती सरकारकडून देण्यात आलीयं. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमची राजकीय इच्छाशक्ती असेल तर तुम्ही आरक्षण देण्याचा निर्णय घ्या ना…विरोधक नाही आले तरी तुम्ही तर आरक्षण देऊन टाका ना. विरोधक नाही आले म्हणून कारणे सापडले. तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही आणि महाविकास आघाडीलाही द्यायचं नाही, दोन्ही सारखेच आहेत, तू हाणल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, अशी सडकून टीका मनोज जरांगे यांनी यावेळी केलीयं.

‘Bad News’ सिनेमातील विकी-तृप्तीचे इंटिमेट सीन कसे शूट केले? करण जोहरने सांगितला सेटवरील अनुभव

आता मराठा बांधवांनीच मराठा आमदारांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी करायला हवी, नाहीतर आमदारांना गावात येऊ नका म्हणा.. सरकारने फसवलं तर पुन्हा लढायचं. सगेसोयऱ्यांमुळे ओबीसीमधील सर्वच समाजाला फायदा होणार आहे. सरकार कुणाचंच नसतं खुर्चीसाठी सगळं असतं, अशीही टीका मनोज जरांगे यांनी केलीयं.

…म्हणताच धनंजय मुंडेंचे कानं टाईट :
कुणबी आणि मराठ्यांच्या जुन्या नोंदी सरकारला सापडलेल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे. दोघांचेही व्यवसाय शेती आहेत. त्याचं आधारावर मराठवाड्यासह महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबीचे दाखले देण्यात यावेत. याच आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही, त्या मागेल त्या मराठ्याला कुणबीचा दाखला देण्यात यावा… मी असं म्हणताच धनंजय मुंडे यांने कानं टाईट झाल्याचं दिसून आल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज