लंडनहून आणलेली वाघनखे छत्रपती शिवरायांचीच…; मुनगंटीवारांची विधानसभेत माहिती

लंडनहून आणलेली वाघनखे छत्रपती शिवरायांचीच…; मुनगंटीवारांची विधानसभेत माहिती

 

Sudhir Mungantiwar : राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखं (Waghnakhe) लंडनमधून आणणार आहे. मात्र याबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहे. दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी ही वाघनखं महाराजांची नसल्याचा दावा केला होता. त्यावर आता मंत्री सुधीर मुनगंटीवा (Sudhir Mungantiwar) यांनी भाष्य केलं.

Sharvari Jamenis: अभिनेत्री शर्वरी जमेनीसचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण! 

छत्रपती शिवाजी महाराजांची आणण्यात येणारी वाघनखे खरी आहेत का, याबाबत सावंत यांनी शंका उपस्थित केली होती. त्यावर मुनगंटीवार यांनी विधानसभेत यासंदर्भात एक निवेदन दिले. ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचे आमच्याकडे आलेल्या माहितीवरून स्पष्ट आहे, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं.

वाघनखं तीन वर्षासाठी भारतात…
ते म्हणाले की,आम्ही माहिती घेतली की ही वाघनखं लंडनला गेल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. ही प्रदर्शने 1875 आणि 1896 मध्ये भरवली गेली. त्यावेळच्या वृत्तपत्रांमध्येही याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानुसार ही वाघ त्या संग्रहालयात असल्याचे सांगण्यात आले. आपला पत्रव्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी वर्षभरासाठी प्रही वाघनखं दर्शनासाठी देऊ असं सांगितलं. पण आम्ही पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर तीन वर्षासाठी वाघनखे आपल्याकडे राहतील, असा निर्णय झाला.

Tamanna Bhatia अन् टायगर श्रॉफ ‘या’ प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदा दिसणार एकत्र

वाघनखांसाठी 14 लाख 8 हजारांचा खर्च,
काहींनी शंका उपस्थित केल्या की, वाघनखे आणण्यासाठी भाडे दिले जाणार का? तर एक नवीन पैशाचे भाडे दिले जाणार नाही. वाघनखे आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा दावा करण्यात आला होता. पण हे असत्य आहे. आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाच्या खर्चापेक्षाही कमी खर्च म्हणजे प्रवास आणि कराराचा खर्च यासाठी 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला, असं मुनगंटीवार म्हणाले.

9 जुलैला वाघनखे साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube