Sharvari Jamenis: अभिनेत्री शर्वरी जमेनीसचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

Sharvari Jamenis: अभिनेत्री शर्वरी जमेनीसचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

Sharvari Jamenis Debut: 1999 साली प्रदर्शित झालेल्या बिनधास्त या सिनेमातून मराठी मनोरंजनसृष्टीत (Marathi Entertainment) पदार्पण करणारी अभिनेत्री शर्वरी जेमनिस (Sharvari Jamenis) सर्वांना नक्कीच आठवत असेल. एक उत्तम अभिनेत्री आणि उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगणा अशी अनोखी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री शर्वरी जेमिनिसनं (Sharvari Jamenis) फार कमी सिनेमामध्ये देखील काम केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharvari Ashok Jamenis (@sharvarijamenis)


परंतु ज्या सिनेमामध्ये काम केलं तिचे ते सिनेमे जोरदार हिट ठरले आहे. पहिल्याच सिनेमासाठी तिला फिल्मफेअर (Filmfare Award) पुरस्कारांनी गौरव करण्यात आला होता. अभिनयापेक्षा शर्वरी जेमिनीस नृत्यात चांगलीच रमली आहे. सुप्रसिद्ध गुरू रोहिणी भाटे (Rohini Bhate) यांच्याकडे तिनं कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं. त्यामुळे कायमच अभिनयाअगोदर नृत्य हे शर्वरीचं पहिलं प्रेम आहे. आता अभिनेत्री शर्वरी जेमनिस निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.

अभिनेत्री शर्वरीच्या (Sharvari Jamenis) वर्कफ्रंट बद्दल सांगायचं झालं तर शर्वरी पूर्णत: कथ्थक नृत्यासाठी काम करत आहे. पुण्यामध्ये तिचे कथ्थकचे जोरदार क्लासेस चालतात. अनेक मुली तिच्याकडे कथ्थकचं शिक्षण घेत आहेत. शर्वरीनं निखिल पाठकसोबत लग्न केले आहे. दोघांना एक मुलगा आहे.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली, ’माझ्या झोळीत…’

निखिल हा देखील सुप्रसिद्ध तबला वादक आहे, त्याचं दोघेही शास्त्रीय संगीत आणि कथ्थक यांचे एकत्र व्हिडीओ शेअर करत असल्याचे पाहायला मिळत असते. शर्वरीचे डान्सचे व्हिडीओ देखील ती नेहमी शोषलं मीडियावर शेअर करत असते. सुप्रसिद्ध गाण्यांवर ती करत असलेले एक्सप्रेशन्स रिल चाहत्यांना खिळवून ठेवतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज