छगन भुजबळ पिसाळलेलं कुत्र चावल्यासारखं करतोयं; मनोज जरांगेंची जळजळीत टीका
Manoj Jarange Patil On Chagan Bhujbal : छगन भुजबळ पिसाळलेलं कुत्र चावल्यासारखं करत असल्याची जळजळीत टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मंत्री छगन भुजबळांवर (Chagan Bhujbal) केलीयं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे यांची राज्यभरात शांतता रॅली सुरु आहे. लातूरमध्ये जरांगे यांची रॅली असून रॅलीच्या सांगतेदरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळला कष्टाने कसं खावं लागतं, हे माहित नाही. छगन भुजबळ तुला फुकट आरक्षण मिळालं आहे. तुला या आरक्षणाची किंमत कळायची नाही. ज्याने कष्टातून, संघर्षातून आरक्षण मिळवलं त्यालाच आरक्षणाची किंमत माहिती आहे. आमचं 16 टक्के आरक्षण छगन भुजबळने घेतलंयं, फुकट खायला गोड लागतं. संघर्ष करुन बघ मग कळेल की, कष्टाचं अन् फुकट खाण्यात काय मज्जा आहे, अशी जळजळीत टीका मनोज जरांगे यांनी केलीयं.
Akshay Kumar: ‘सरफिरा’ हा माझा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेत्याने थेटच सांगितले
तसेच सध्या छगन भुजबळ पिसाळलेलं कुत्र चावल्यासारखं करतोयं. मराठे शांततेने घेत आहेत पण पिसाळलेल्या कुत्र्याला कुठं गाठायचं हे मराठ्यांना चांगलं माहीत आहे. छगन भुजबळ तुला फडणवीसांमुळे लाल दिवा मिळाला आहे. जर मराठ्यांच्या नाद्याला लागला तर पुन्हा जेलमध्ये कांदे खायाला जावं लागणं. भुजबळ तुला जेलमध्ये पाठवल्यासिवाय मी शांत बसणार नसल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी दिलायं.
आरक्षणामुळे मराठ्यांच्या चार पिढ्या बरबाद :
आरक्षणापायी मराठा समाजाच्या चार ते पाच पिढ्या बरबाद झाल्या आहेत. आमच्या अनेक बांधवांचे बलिदान गेले आहेत. आमच्या आया बहीणींचं कुंकू पुसलेलं आहे. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंब कसं उघडं पडत याबाबत छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही. त्यामुळे तुम्ही एकदा त्यांच्या घरी जाऊन बघा काय परिस्थिती आहे. जे कुटुंब उघडलं पडलं त्यांच्या पाठीवरुन हात फिरायला कोणी नाही. आरक्षण असूनही भुजबळ विरोध करतोयं, तुला तुझे लेकंर अधिकारी झालेले बघू वाटतेतं मराठ्यांचे वाटत नाही का? असा सवालही मनोज जरांगे यांनी यावेळी केलायं.