मोठी बातमी : ‘मराठा आरक्षणा’बद्दल 10 दिवसात मुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार; सत्तारांचा गौप्यस्फोट

मोठी बातमी : ‘मराठा आरक्षणा’बद्दल 10 दिवसात मुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार; सत्तारांचा गौप्यस्फोट

Abdul Sattar On Maratha Reservation : राज्य सरकारकडून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्या मागण्यांचा गांभिर्यांने विचार करत असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)हे येत्या 10 दिवसात ‘ती’ ब्रेकींग न्यूज देण्याची व्यवस्था सरकारतर्फे आम्ही करु असा शब्द मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. येत्या दहा दिवसात हा विषय संपवायचा आहे. असंही यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

अजितदादांना सोबत ठेवायचं की नाही पक्ष ठरवेल, आमदार कुल यांचं विधान

यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, शेवटी मराठा आरक्षणावरुन कोणीही राजकारण करणार, पण त्यांच्या राजकारणाशी मला काही घेणेदेणे नाही. पण मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी समाजावर कसलाही अन्याय न होता कायद्याच्या चौकटीत बसून न्याय देता येणार असल्याचेही यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबतीत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करण्यात यावा, आंदोलकांवरील गु्न्हे मागे घेण्यात यावेत अशा विविध मागण्यांसाठी एक महिन्याची सरकारला मुदत देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

त्यानंतर सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना गांभिर्याने घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या लवकरच पूर्ण करणार असून येत्या दहा दिवसांत या मागण्या पूर्ण केल्या जाणार असल्याचा गौप्यस्फोट मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी ही 30 जूनपूर्वी करा अशी आग्रही मागणी करत 13 जुलैपर्यंत राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा अन्यथा यापुढे सरकारचे ऐकणार नसल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. सरकारने एका महिन्यात मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास आगामी विधान सभा निवडणुकीत उतरणार असल्याचा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना दिलेला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज