Manoj Jarange : सासरवाडीत का राहतो? भुजबळांच्या टीकेला जरांगेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी कंबर कसली आहे. मात्र मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी आज ओबीसी समाज एकवटला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर भुजबळांच्या टीकेला जरांगेंकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
भुजबळ यांनी जरांगेंवर केलेल्या टीकेवर त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, ते कुठले आहेत? हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते वयाने मोठे आहेत. तर काढायला लावू नका. आम्ही देखील तुमच्या बाबतचा बायोडेटा गोळा केलेला आहे. तसेच मी सासऱ्याच्या घरी राहतो. कारण या ठिकाणी बीड जिल्ह्यातील अनेक लोक आलेले आहेत.
Maratha Reservation चा आणखी एक बळी, जरांगेंच्या जालन्यात 14 वर्षे मुलीनं संपवलं जीवन
तिथं सासरा आणि जावई हा प्रश्न नाही. बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ असल्याने जालन्यातील गोदापट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज स्थलांतरित झाला आहे. मात्र त्यांना याची माहिती नाही. कोणीतरी एखाद्या माकडाने त्याच्या स्वार्थासाठी त्यांना चुकीची माहिती दिलेली आहे. लोक मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले आहेत. आम्ही तुमच्या शेपटीवर काय दिलेला नाही. तुम्हीच आमच्या पायामध्ये पाय घालू नका. अन्यथा आम्ही देखील तुमची खैर करणार नाही. असा इशारा यावेळी जरांगे यांनी भुजबळ यांना दिला आहे.
काय म्हणाले होते छगन भुजबळ?
ते म्हणाले की, जरांगे मला विचारतात की, मी कुणाचं खातो? अरे मी काय तुझं खातो का? हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही. असे छगन भुजबळ म्हणाले. तेसेच ते पुढे म्हणाले की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये. 56 मराठी मोर्चे पण आम्ही कुणालाही विरोध केला नाही. तसेच आम्ही कुणाची घरं दारं देखील जाळली नाहीत.
शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या मुलाचे लग्न : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची यंत्रणा दिमतीला
ओबीसी आरक्षणावर प्रश्न उपस्थित करता पण ओबीसीतील सर्व जाती या कायद्याने आल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला गरिबी हटाव मोहिमेसारखी वागणूक देऊ नका. तसेच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये अवैधरित्या घुसतो आहे. असे छगन भुजबळ म्हणाले. ईडब्लूएसमध्ये मराठा समाजाला जो लाभ मिळाला तो ओबीसींना देखील मिळालेला नाही. मराठा समाजाला 10-11 कोटी मिळतात. मात्र ओबीसी समाजाला हजार कोटी मिळत नाहीत तर मराठा समाज 85 टक्के मराठा समाज ईडब्लूएसचा लाभ घेतोय.