Maratha Reservation चा आणखी एक बळी, जरांगेंच्या जालन्यात 14 वर्षे मुलीनं संपवलं जीवन

Maratha Reservation चा आणखी एक बळी, जरांगेंच्या जालन्यात 14 वर्षे मुलीनं संपवलं जीवन

Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. या दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे जरांगे यांच्या जालना जिल्ह्यामध्येच एका चौदा वर्षीय मुलीने मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं आहे.

जरांगेंच्या जालन्यात 14 वर्षे मुलीनं संपवलं जीवन…

मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे ज्या जालना जिल्ह्यातील आहेत. तेथेच एका चौदा वर्षांच्या मुलीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. त्यावेळी मरणापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. गुरूवारी जिल्ह्यातील सोमेश्वर भागामध्ये ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.

शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या मुलाचे लग्न : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची यंत्रणा दिमतीला

यावेळी तीने जी चिठ्ठी लिहून ठेवली त्यात तिने म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं आणि माझे शब्द वाया जाता कामा नये. या अगोदर देखील मराठा आरक्षणासाठी अनेक तरूणांनी जीवन संपवलं आहे. त्यांनी देखील अशाच प्रकारे चिठ्ठी लिहून ठेवत आपण मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी आपण आरक्षण नसल्यानेच आपण वैतागलो आहोत असंही म्हटलेलं होतं.

जरांगेंनी सुरू केला राज्याचा दौरा…

मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाज आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा राज्याचे दौरे सुरू केले. त्यांची आज कोल्हापुरात सभा झाली.

Maharashtra Police : महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक कोण होणार? या अधिकाऱ्यांची नावांची चर्चा

जरांगे पाटील राज्यभर मोर्चे काढत आहेत. साखळी आंदोलन करत आहेत. त्यांनी राज्यात सभाही घ्यायला सुरूवात केली. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत आहे. जरांगे पाटील यांची आज ऐतिहासिक दसरा चौकात जाहीर सभा झाली. या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हजर होते. या सभेला छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube