Honda Amaze 2025 भारतीय बाजारात उद्या करणार एंट्री, आजच जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Honda Amaze 2025 : भारतीय बाजारात उद्या म्हणजेच 4 डिसेंबर रोजी होंडा आपली लोकप्रिय कार Honda Amaze नवीन जनरेशनमध्ये लाँच करणार आहे. कंपनीकडून या नवीन सेडान कारचा टिझर रिलीज करण्यात आले आहे. तसेच कंपनीकडून या कारसाठी बुकिंग देखील सुरु झाली आहे.
माहितीनुसार, कंपनी या नवीन जनरेशन कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि शक्तीशाली इंजिन देणार आहे. तसेच या कारमध्ये ADAS चा देखील समावेश असणार आहे. नवीन जनरेशन होंडा अमेझ भारतीय बाजारात नुकतंच लाँच झालेली मारुती सुझुकी डिझायरशी स्पर्धा करणार आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये कंपनी एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, डीआरएल, नवीन ग्रिल, एलईडी फॉग लाइट्स आणि नवीन बंपर देणार आहे. भारतीय बाजारात स्वस्त सेडान अमेझची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळे नवीन अमेझ देखील भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार असल्याची चर्चा सध्या बाजारात सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन अमेझ त्याच प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे ज्यावर नवीन Honda City आणि Elevate आधारित आहेत. नवीन अमेझला नवीन लुक देण्यासाठी कंपनीने या कारच्या केबिनमध्ये देखील बदल केल्या आहे. तसेच या कारची डिझाइन परदेशात विकल्या जाणाऱ्या होंडाच्या एंट्री-लेव्हल सेडानपासून घेण्यात आली आहे.
या कारच्या केबिनमध्ये नवीन अपहोल्स्ट्री, डॅशबोर्डचे फ्रेश लुक आणि नवीन फीचर्स ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. शक्तिशाली इंजिन माहितीनुसार, नवीन अमेझमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 1.2-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन 90 HP पॉवर आणि 110 Nm पीक टॉर्क निर्माण करते, कंपनीने याला 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय देऊ शकते.
‘मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का’ म्हणणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप
भारतीय बाजारात नवीन अमेझ मारुती सुझुकी डिझायर, ह्युंदाई ऑरा आणि टाटा टिगोरशी स्पर्धा करणार आहे. तसेच भारतीय बाजारात ही कार 7.50 लाख एक्स शोरुम किमतीसह लाँच होऊ शकते.