‘मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का’ म्हणणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप
MNS Khetwadi News : मुंबईत भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळे मराठीत नाहीतर मारवाडीमध्ये बोलायचं असं हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, गिरगावातील खेतवाडी येथे एका मारवाडी दुकानदाराने (Marwari Shopkeeper) मराठी बोलणाऱ्या महिलेला राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे. आता मराठीमध्ये नाहीतर मारवाडीमध्ये बोलायचं असं सांगितले होते त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चोप दिला.
माहितीनुसार, वस्तू खरेदीसाठी महिला दुकानात गेली होती तेव्हा त्या दुकानदाराने मराठीमध्ये का बोलली असा जाब महिलेला विचारला आणि ‘बीजेपी आया है, मारवाडी में बात करनेका. मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का’ असं त्या दुकानदाराने महिलेला म्हटलं. त्यानंतर संबंधित महिला न्याय मागणीसाठी भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे गेली पण लोढांनी तिला उद्धट उत्तर दिला असल्याचा दावा महिलेने केला आहे. तुम्ही आमच्यात भांडण लावताय असं लोढांनी सांगितले असल्याचा दावा महिलेने केला आहे. त्यानंतर महिलेने खेतवाडी मनसे कार्यालयाकडे तक्रार केली.
“मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, लढणारच!” बाळासाहेब थोरातांनी आता ठरवलंच
त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या दुकानदाराला बोलावून जाब विचारला तेव्हा आपण महिलेला मारवाडीत बोलायला सांगितल्याचं दुकानदाराने मान्य केलं. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चोप दिला. यानंतर दुकानदाराने आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली. तसेच यानंतर कधीही असं होणार नाही अशी ग्वाही देखील दुकानदाराने दिली.
‘जिलबी मध्ये दिसणार स्वप्नीलचा बेधडक डॅशिंग अंदाज, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट