भाजपच्या रणनीतीप्रमाणे काम करा; आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंच्या कडक सूचना

भाजपच्या रणनीतीप्रमाणे काम करा; आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंच्या कडक सूचना

Uddhav Thackeray BMC Meeting : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बूस्ट मिळाला होता. सहा महिन्यानंतर झालेल्या निवडणुकीत पुरती दाणादाण उडाली. सहानुभूतीची मतं ठाकरेंना मिळाली नाहीत. कशातरी 20 जागा निवडून आल्या. आघाडीच्या सगळ्याच डावपेचांवर भाजपाची रणनीती सरस ठरली. आता आपलं कुठं चुकलं, काय कारणं होती ज्यामुळे इतका मोठा पराभव पदरी पडला याची उत्तर शोधली जात असतानाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपाचे बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन काम करतात त्या पद्धतीनेच आपण आता काम केलं पाहिजे. शिवसैनिकांनी तळागाळात जाऊन कामाला लागलं पाहिजे अशा सूचना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात Uddhav Thackeray यांची तोफ धडाडणार ! नवा वार कोणता करणार ?

हिंदुत्वाचा प्रचार करणार

शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य प्रत्युत्तर द्या अशा सूचना उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिल्या.

मुंबई पालिकेवर भगवाच फडकावयचा

भाजप पक्षाचे बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात, तसं आपणही तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे, असं मत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांसमोर मांडलं. उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकवायचा आहे. ईव्हीएमचा मुद्दा तर आहे मात्र त्याबाबत आम्ही बघू तुम्ही संघटनात्मक बांधणी आणि ताकदीने कामाला लागा. निवडणुका कधीही जाहीर होतील अशी चिन्हे आहेत त्यामुळे गाफील राहू नका. पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकदीने कामाला लागा असे आदेशच उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिले.

 उद्धव ठाकरे सोबत असते तर.. सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

follow us
  • fb
  • instagram
  • youtube