मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात Uddhav Thackeray यांची तोफ धडाडणार ! नवा वार कोणता करणार ?
Uddhav Thackeray Shivsankalp Melava in Thane cm ekanth shinde : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly election 2024) महायुती आणि महाविकास आघाडीन जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटप अंतिम झालेले नसले तरी राज्यात सर्व पक्षांनी मेळावे, यात्रा सुरू केल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेकडून शिवसंकल्प मेळावे घेतले जात आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. त्यात स्वतः अजित पवार व पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे.
Vinesh Phogat: … तर विनेश फोगटला अपात्र ठरवणे योग्य होते, सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल
शिवसेनेने पुण्यात पहिला शिवसंकल्प मेळावा घेतलाय. त्या मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर होते. अमित शाह हे अब्दालीचे राजकीय वशंज आहेत. तर फडणवीस हे ढेकूण आहे, असा उल्लेखच ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला, त्यावरून भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरेंची अक्कल काढली होती. आता उद्या शनिवारी शिवसंकल्प मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम पिच ठाण्यात होत आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे लक्ष लागून आहेत.
पंढरपूर येथे एक हजार खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय मंजूर; आरोग्यमंत्री सावंत यांची माहिती
हा मेळावा गडकरी रंगायतन येथे होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, प्रवक्ते संजय राऊतही या मेळाव्यात भाषण करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय टोलेबाजी होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर शेलक्या भाषेत टीका केलीय. गद्दार, मिंध्ये, पक्ष, वडिले चोरणारे असे शब्द एकनाथ शिंदे यांच्याबाबत वापरले गेले आहेत. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर कुठला वार करतात ते त्यांच्या उद्याच्या भाषणात समजेल.
ठाण्यातील पराभव जिव्हारी
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला चांगले यश आले असले तरी ठाण्यात खासदार राजन विचारे यांचा पराभव झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास नरेश म्हस्के हे मोठ्या मताधिक्याने येथून निवडून आलेले आहेत. हा पराभव उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारीला लागलेला आहे. या पराभवाचा बदला विधानसभा निवडणुकीत कसा घ्यायचा, याबाबत उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना कानमंत्र देऊन लढण्यास सज्ज करतील.