Vinesh Phogat: … तर विनेश फोगटला अपात्र ठरवणे योग्य होते, सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल
Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) महिला 50 किलो गटातील फायनल सामन्यापूर्वी विनेश फोगटला (Vinesh Phogat) निर्धारित वजनापेक्षा जास्त वजन असल्याने या स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर विनेश फोगटने क्रीडा लवादा न्यायालयात (CAS) याचिका दाखल करत रौप्यपदक मिळावा अशी मागणी केली आहे. तर या मागणीला आता सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील समर्थन देत या स्पर्धेत विनेशला रौप्यपदक का मिळायला हवं याचं मोठं कारण सांगितले आहे.
याबाबत सचिनने एक एक्सवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सचिनने म्हटले आहे की, प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि त्यानुसारच सर्वजण खेळ खेळत असतात. विनेश पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचली होती मात्र फायनलपूर्वी तिचे वजन करण्यात आले आणि ती तेव्हा या सामन्यासाठी अपात्र ठरली. परंतु ती रौप्यपदकाची हकदार आहे मात्र तिच्याकडून रौप्यपदक हीरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा दिसून येत आहे. असं सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.
#VineshPhogat #Paris2024 #Olympics @WeAreTeamIndia pic.twitter.com/LKL4mFlLQq
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 9, 2024
या ट्विटमध्ये तो पुढे म्हणाले की, जर या स्पर्धेत विनेशने कोणतीही अनैतिक गोष्ट केली असती तर तिला अपात्र ठरवणे योग्य होते मात्र विनेशने उत्तेजक द्रव्याचे सेवन केले नाही. ती फायनलमध्ये पोहोचली विजय मिळवूनच. या स्पर्धेत तिने प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत केले आणि फायनलमध्ये पोहोचली त्यामुळे विनेशला रैप्य पदक मिळायला हवे.
पदकासाठी विनेश फोगटला करावं लागणार ‘वेट अँड वॉच’; याचिका करताना एक गोष्ट विसरली
तसेच विनेशचे प्रकरण आता क्रीडा लवादाकडे आहे आणि याबाबत लवकरच निर्णय येणार आहे. विनेश ज्या गोष्टीची हकदार आहे ती तिला मिळायला हवी. यासाठी आपण प्रार्थना करू आणि चांगलाच निर्णय समोर येईल अशी अशा करूया. असं सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.