अमित शाहंची बैठक, आतिशींचा राजीनामा…दिल्लीत सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

अमित शाहंची बैठक, आतिशींचा राजीनामा…दिल्लीत सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

Delhi CM Atishi Submit Resignation : दिल्लीत नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री आतिशी यांनी (CM Atishi) राजीनामा दिलाय. तर दुसरीकडे भाजपच्या छावणीत बैठकांची मालिका सुरू झालीय. दरम्यान, भाजप नेते प्रवेश वर्मा, कैलाश गेहलोत आणि अरविंदर सिंग लवली यांनी दिल्लीचे उपराज्यपाल यांची भेट घेतली असल्याचं समोर आलंय. भाजप नेते राजभवनात पोहोचण्यापूर्वीच आज आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (Delhi Election 2025) दिलाय.

दिल्ली विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यात भाजपला (BJP) बहुमत मिळालंय तर कॉंग्रेस आणि आपला अपेक्षित यश मिळालं नाहीये. आम आदमी पक्षाच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी रविवारी राजीनामा सादर केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आज सकाळी 11 वाजता राज निवास गाठले. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना राजीनामा सादर केला. आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, उपराज्यपालांनी सातवी दिल्ली विधानसभा बरखास्त केलीय.

कोकणात ठाकरेंना मोठा धक्का! राजन साळवींसह ‘ते’ दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी मुख्यमंत्री झाल्या होत्या. 21 सप्टेंबर रोजी त्यांचा शपथविधी झाला. त्या सुमारे चार महिने दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्यात. या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा दारुण पराभव झालाय.

एकेकाळी 70 पैकी 67 जागा जिंकणाऱ्या ‘आप’ला यावेळी 22 जागांवर घसरण झालीय. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. 70 पैकी 48 जागा जिंकून 27 वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत परतलाय. केजरीवाल-मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक मोठे चेहरे पराभूत झालेत. कालकाजी मतदारसंघातून आतिशी विजयी झाल्या आहेत. दिल्लीतील 70 जागांवर 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. यावेळी 60.54 टक्के मतदान झालेय, तर गेल्या वेळी 62.60 टक्के मतदान झाले होते.

शिर्डीत दहशत! हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

2015 आणि 2020 च्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतर 2025 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हा विजय मिळालाय. 27 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, भाजपला दिल्लीत पूर्ण बहुमत मिळाले आहे. दिल्लीतील 70 जागांपैकी भाजपने 48 जागा जिंकल्या, तर आपला फक्त 22 जागांवर समाधान मानावे लागले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube