केजरीवाल फेल, ‘या’ 5 मुद्द्यांमधून समजून घ्या भाजपने कशी मारली बाजी?

  • Written By: Published:
केजरीवाल फेल, ‘या’ 5 मुद्द्यांमधून समजून घ्या भाजपने कशी मारली बाजी?

Delhi Election Results : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये (Delhi Election Results) भाजपने (BJP) सर्वांना धक्का देत 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये (Delhi) सत्ता स्थापन करणार आहे. या निवडणुकीत भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे (AAP) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. मात्र या निवडणुकीत आम आदमी पक्षाला पराभवाला का सामोरे जावे लागले हे 5 मुद्यातून समजून घेऊया.

भ्रष्टाचाराचे आरोप

शीला दीक्षित यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सरकारमध्ये आलेल्या आम आदमी पक्षावर गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत होते. तर कथित दारू धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात देखील जावे लागले. ज्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला आणि केजरीवाल देखील भ्रष्टाचार करत आहे हे जनतेला सांगण्यात भाजप यशस्वी झाला.

शीशमहाल वाद

तर दुसरीकडे मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाच्या सुशोभीकरणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे जनतेला असा संदेश गेला की जे स्वतःला सामान्य माणूस म्हणतात ते सरकारी सुविधांचा गैरफायदा घेत आहे. याचा देखील परिणाम दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झाला.

सत्ता विरोधी लाट

आम आदमी पक्ष सलग तीन वेळा दिल्लीत सत्तेत होता त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात सत्ताविरोधी लाट निर्माण झाली होती ज्याच्या फायदा भाजपने घेत विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

अंतर्गत वाद

विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षातील अंतर्गत कलह असल्याने याचा परिमाण देखील निवडणुकीच्या निकालावर झाला आहे. राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल वादामुळे पक्षाचे खूप नुकसान झाले. या वादामुळे पक्षाला मोठा धक्का बसला. स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल आणि आप विरोधात उघडपणे विधाने केली होती.

Delhi Election Results : मोठी बातमी! दिल्लीत ‘आप’ ला मोठा दिलासा , मुख्यमंत्री आतिशी विजयी

वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीदरम्यान प्रचार करत असताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपला गुंडांचा पक्ष म्हणाले होते तसेच त्यांनी यमुनेच्या पाण्यात विष असल्यासारखी विधाने केली जी लोकांना आवडली नाही आणि याचा परिमाण विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिसून आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube