Delhi Election Results : मोठी बातमी! दिल्लीत ‘आप’ ला मोठा धक्का, मनीष सिसोदिया यांचा पराभव

  • Written By: Published:
Delhi Election Results : मोठी बातमी! दिल्लीत ‘आप’ ला मोठा धक्का,  मनीष सिसोदिया यांचा पराभव

Delhi Election Results : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु असून सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election Results) पराभव झाला आहे. जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी त्यांचा पराभव केला आहे. भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांच्याकडून मनिष सिसोदिया यांचा 675 मतांनी पराभव झाला आहे.

पराभव स्वीकारताना ते म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगली लढाई लढली, आम्ही सर्वांनी कठोर परिश्रम केले. लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला, पण मी 600 पेक्षा जास्त मतांनी हरलो. मी विजयी उमेदवाराचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की तो या क्षेत्रासाठी काम करेल.

तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा देखील नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार प्रवेश वर्मा (Pravesh Verma) यांनी बाजी मारली आहे.

मोठी बातमी! आरक्षण द्या नाहीतर 15 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण, जरांगेंचा सरकारला इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube