शिर्डी दुहेरी हत्याकांडातील दुसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या; एलसीबीची कारवाई…
Shirdi Double Murder : अहिल्यानगरमधील शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील (Shirdi Double Murder) दोन्ही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आलंय. या घटनेतील मृतांमध्ये साईबाबा संस्थानच्या दोन्ही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेचं सीसीटिव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल होताच एकच खळबळ उडाली होती.
मुंडेंची पाठराखण भोवली; मराठा समाजाच्या विरोधामुळे महंत नामदेव शास्त्रींचं किर्तन रद्द!
नेमकं काय घडलं होतं?
सुभाष घोडे हे ड्युटीवर येत होते. तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला. मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सुमारास कामावर जात असताना लुटमार करण्याच्या उद्देशाने अज्ञातांनी त्यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. शिर्डी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
करवाढ, शुल्कवाढ, भुर्दंडवाढ नसलेला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच किरण ज्ञानदेव सदाफुले वय 30 वर्षे, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता.राहाता यास अटक करुन त्याची 07 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली. मात्र, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा फरार होता अखेर काल 4 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनूसार दुसरा आरोपी राजू उर्फ शाक्या अशोक माळी याचं पोलिसांनी अटक केलीय. या आरोपींची कसून चौकशी केली असता आपण लुटमार करण्याच्या उद्देशाने हत्या केली असल्याची कबुली किरण सदाफुले याने दिलीयं.
दरम्या ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
बाहेरील लोकं नशा करुन शिर्डीत गुन्हे करतात – सुजय विखे
शिर्डीमध्ये बाहेरचे गुन्हेगारी करणारे लोक येऊन अशा घटना करतात. कारण शिर्डीमध्ये जेवण फुकट मिळते, तसेच राहण्याची सोयसुद्धा कमी खर्चामध्ये होत असते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिर्डीमध्ये घेऊन अशा घटना करत असतात. नशा करण्यासाठी वेगवेगळे प्रकार वापरतात. त्यामध्ये आयोडेक्स, व्हाईटनर इत्यादी कमी पैशात उपलब्ध होणारे साधनांमध्ये ते नशा करत असतात, त्याच नशेतून हा खून झाल्याचं असल्याचं माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलंय.