Devendra Fadnavis : Gen Z साठी CM फडणवीसांचे 9 महत्त्वाचे निर्णय, ठरणार गेमचेंजर

Devendra Fadnavis : नीट पेपर फुटी प्रकरणात देशात जेन झी ने आक्रमक भूमिका घेत शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांचा राजीनामा घेतला असून आता

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : नीट पेपर फुटी प्रकरणात देशात जेन झी ने आक्रमक भूमिका घेत शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांचा राजीनामा घेतला असून आता देखील केंद्र सरकारविरोधात सोशल मीडिया असो किंवा इतर ठिकाणी प्रदर्शन करताना दिसत आहे. जेन झी ने आक्रमक भूमिका घेतल्याने केंद्र सरकारला याचा मोठा फटका बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राजकारणात जेन झी चे महत्व वाढल्याने त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारीसह विरोधक देखील प्रयत्न करताना दिसत आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 महत्त्वाचे निर्णय घेतले आहे.

राज्यात जेन झी ला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 31 मार्च 2027 पर्यंत 1 हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिली आहे. मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक झाली असून या बैठकीत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटीलसह सदस्य डॉ. सरोजिनी राऊत, रविंद्र देशपांडे, विशाल टिब्रेवाल, जयेश ढाके, राहुल खोले आणि इतर शासकीय सदस्य उपस्थित होते. या बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.

9 महत्त्वाचे निर्णय

– आयटीआय व्यतिरिक्त इतर कॉलेजमधील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरत असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून रोजगार मेळाव्याचा विस्तार करण्यात येणार आहे.

– प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात रोजगार मेळाव्याची माहिती देण्यात येणार – रोजगाराचे महत्त्व आणि स्वयंरोजगाराचे फायदे सांगण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि एनजीओकडून समुपदेशन

– पहिल्या आठवड्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एथिकेट्स, बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कोशल्यांवर भर देण्यात येणार

– दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अ‍ॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांत थेट प्रात्यक्षिक देण्यात येणार
– केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता उमेदवारांना पूर्व- प्रशिक्षण देण्यात येणार

– रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना दोन आवड्यांचे कौशल्य व पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार

– उमेदवारांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास मेळाव्यांमधील निवडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचा सरकारला विश्वास

एकनाथ शिंदेंना धक्का; धनुष्यबाण हातून जाणार?-

– या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि अंलबजावणीसाठी अधिकारी व प्रदेश समन्वय समिती एकत्र काम करणार

follow us