आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश! हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती…
मुंबई : रेल्वेने दादर येतील हनुमान मंदिर (Hanuman Temple) पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत, अशी टीका भाजपवर केली होती. यानंतर आता आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी आज दादर पूर्व येथील हनुमान मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर विश्वस्थांशी संवाद साधला आणि आरती केली. यावेळी त्यांनी या निर्णयाला थांबवण्याची ऑर्डर माझ्याकडे आली, अशी माहिती दिली.
काँग्रेसचं चाललंय काय? आमदार अन् उमेदवारांची बैठक; पराभवाचं उत्तर मिळणार..
प्रसंगी आमदार कालिदास कोळंबकर, बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. या मंदिराचे निष्कासन होणार नसून या बाबत आपण स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी बोललो आहोत. या निर्णयाला थांबवण्याची ऑर्डर देखील माझ्याकडे आहे, असे यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
मंगल प्रभात लोढा यांनी आमदार आशिष शेलार यांच्या समवेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली. त्यानुसार, कारवाई स्थगित करण्यात आली आहे.
हनमान मंदिराला भेट दिल्यानंतर लोढा म्हणाले केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. हिंदू समुदायाची या मंदिराबाबतची भावना आम्ही जाणतो त्यामुळे या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही असे आश्वासन मी देतो. या मंदिराबाबत समजल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते, बजरंग दलाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आम्ही सर्वच केंद्रीय रेल्व मंत्री अश्विन वैष्णव यांच्या संपर्कात होतो. मंदिराचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले या पुढे सुद्धा नेहमिच करु. धार्मिक आस्थेच्या विषयाचे राजकारण करण्याचा काहींचा मानस सफल होण्याआधीच आम्ही मंदिर वाचवण्यात यशस्वी झालो, असं लोढा म्हणाले.
19 जुलै 1937 मध्ये पुण्यात झाला होता मंत्रिमंडळाचा शपथविधी; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?
दरम्यान, दादर पूर्वेला प्लॅटफॉर्म क्रमांक 12 च्या बाहेरील हनुमान मंदिर अनधिकृत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनने केला. याशिवाय या मंदिराच्या विश्वस्तांना नोटीस देण्यात आली आहे की, 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्तांनी ते स्वतः पाडावे, अन्यथा रेल्वे ते पाडेल. त्यानंतर आता सदर नोटीसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.