19 जुलै 1937 मध्ये पुण्यात झाला होता मंत्रिमंडळाचा शपथविधी; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?

  • Written By: Published:
19 जुलै 1937 मध्ये पुण्यात झाला होता मंत्रिमंडळाचा शपथविधी; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?

पुणे : राज्यात महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झाल्यानंतर उद्या (दि.15) नागपूरमध्ये मंत्रिमंडाचा विस्तार होणार आहे. कोणतेही सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईत मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतो. मात्र, यावेळी हा सोहळा नागपूरमध्ये होणार असून, यापूर्वी 19 जुलै 1937 मध्ये पुण्यात मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मुंबईच्या बाहेर नागपूर आणि पुण्यात मंत्रिपदाचा शपथविधी झाला होता. पुण्यात तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 19 जुलै 1937 रोजी झाला होता. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले आहे. नेमकं 1937 साली काय झालं होतं? त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…

ठरलं तर! उद्या होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; CM फडणवीस स्वतः भावी मंत्र्यांना करणार फोन

पुण्यात कुणी-कुणी घेतली होती शपथ?

तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळात ए. बी. लठ्ठे यांनी अर्थमंत्री, के. एम. मुन्शी यांनी गृह आणि कायदा, एम. डी. गिलडर यांनी आरोग्यमंत्री, मोरारजी देसाई यांनी ग्रामीण, महसूल आणि कृषी तर एम. वाय. नूरी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, एल. एम. पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्था खात्याचे मंत्री म्हणून शपथ घेतली होती. या मंत्रिमंडळाने सहा पार्लमेंटरी सचिवांची नियुक्ती केली होती. त्यामध्ये गुलजारीलाल नंदा, बी. एन. गुप्ते, हंसा मेहता, एम. पी. पाटील, टी. आर. नेस्वी, बी. एस. हिरे यांचा समावेश होता.

“भाजपच्या कोणत्या नेत्याला तुरुंगात टाकायचं हे ठरलं होतं”, दानवेंनी केला ‘मविआ’चा प्लॅन उघड

ब्रिटिश राजवटीत पुण्याला बनवले होते राजधानी

ब्रिटिशांनी 1935 साली कायद्यात काही सुधारणा केल्या आणि त्यानुसार प्रांतांना काहीअंशी स्वायत्तता बहाल करण्यात आली होती. 1937 मध्ये मुंबई प्रांतात विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन सभागृहे अस्तित्वात आली. बॉम्बे प्रेसिडेन्सी किंवा बॉम्बे प्रांत हा ब्रिटिश भारताचा एक प्रशासकीय उपविभाग होता. या प्रांतांची राजधानी मुंबई होती. या प्रांतात वर्तमान गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक, सिंध प्रांत आणि येमेनमधील एडन या प्रदेशांचा समावेश होता. ब्रिटिश राजवटीत पुण्याला बॉम्बे प्रेसिडेन्सीची पावसाळी राजधानी बनविण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन राज्यपाल पुण्यात होते. त्यामुळे बाळासाहेब खेर यांचा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पुण्यातील कॉन्सिल हॉल येथे 19 जुलै 1937 रोजी झाला होता.

पवार एकत्र आले तर शिंदेंची गरज संपेल… कशी?; अजित पवार-शरद पवार भेटीमागचे नेमके संकेत काय?

दोन वर्षांनंतर पुन्हा चळवळीत सक्रीय

सुमारे दोन वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर बाळासाहेब खेर हे 1940 नंतर परत एकदा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी झाले होते. 1995 मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान बाळासाहेब खेर यांना मिळाला होता. त्यानंतर 1952 सालापर्यंत ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री राहिले. याच काळात ते शिक्षणमंत्री देखील होते.

पुण्यातील कॉन्सिल हॉलसाठी आला होता सव्वा लाखांचा खर्च

पुण्यातील कॉन्सिल हॉलची निर्मिती 1870 साली इंग्रजांकडून करण्यात आली आहे. त्यावेळी जमिनीची किंमत 50 हजार 875 रुपये इतकी होती. तर, या हॉलच्या बांधकामासाठी त्याकाळी 1 लाख 22 हजार 940 रुपये एवढा खर्च आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube