आम्हाला मंत्रिमंडळात स्थान द्या, पेरा फेडणार नसाल तर…; सदाभाऊ खोतांचा महायुतीला इशारा
आधी छोट्या पक्षांची मंत्रीपदं निश्चित करा. मोठ्या पक्षांना पेरा फेडण्याची वेळ आलीये, पेरा फेडणार नसतील तर आम्हाला बैल विकावा लागेल

Sadabhau Khot : महायुतीला (Mahayuti) बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet expansion) महायुतीमध्ये खलबतं सुरू झाली. 11 किंवा 12 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. आपली मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आमदारांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशातच महायुतीचा घटक असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महायुतीच्या नेत्यांकडे मोठी मागणी करत इशारा दिला. मोठ्या पक्षांची मंत्रिपदं नंतर निश्चित करा, आधी छोट्या पक्षांची मंत्रीपदं निश्चित करा. मोठ्या पक्षांना पेरा फेडण्याची वेळ आलीये, पेरा फेडणार नसतील तर आम्हाला बैल विकावा लागेल, असा इशारा खोतांनी दिला.
CM फडणवीसांनी शब्द पाळला! कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला लावली हजेरी…
सदाभाऊ खोत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता ते म्हणाले की, 2014 पासून आम्ही महायुतीसोबत आहोत. आम्ही नक्कीच अनेक संकटांचा मुकाबल करत आलोत. आम्ही विस्थापितांचे नेतृत्व करतो. म्हणूनच मलाही वाटते की, लढवय्या कार्यकर्त्यांना संधी (मंत्रिपद) मिळावी. कारण त्यामुळं विस्थापितांना लढण्याचे बळ मिळेल, असं ते म्हणाले. पुढं ते म्हणाले की, विस्थापितांना कधीही संघर्ष असतो. माझा संघर्ष हा सत्तेसाठी नव्हता. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष होता. आता मूठभर धान्य त्यांनी आमच्या सुपात टाकायचं की नाही ? हा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा आहे. त्या तिघांनी आधी घटक पक्षांची मंत्रिपदे बाजूला काढावीत, मोठ्या पक्षांची मंत्रिपदं नंतर निश्चित करा, आधी छोट्या घटक पक्षांची मंत्रीपदं निश्चित करा, असं खोत म्हणाले.
बांगलादेश दुसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन! भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद
खोत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार आम्ही निवडून आणला.आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, आता त त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. मोठ्या पक्षांना पेरा फेडण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही पेरा फेडणार नसतील तर आम्हाला बैल विकावा लागेल, असा इशाराही खोतांनी दिला. पुढं पंचायत समित्या, नगरपालिका, झेडीच्या निवडणुका आहेत याचाही विचार व्हावा असं खोत म्हणाले.
गृहखाते कोणाला मिळणार?
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेले एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम आहेत. शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी फडणवीस यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवले होते. आता फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने ‘नैसर्गिक न्यायाने’ आम्हाला गृहमंत्रीपद मिळावे, असा आग्रह शिवसेना धरत आहे. गृहखात्यासोबतच नगरविकास मंत्रालय देखील शिंदेंना हवं आहे. मात्र या दोन्ही मंत्रालयांवर भाजपची नजर आहे.