विधानसभेतील सर्वात श्रीमंत १० आमदार कोण? संपत्तीचे आकडे ऐकून व्हाल थक्क!

विधानसभेतील सर्वात श्रीमंत १० आमदार कोण? संपत्तीचे आकडे ऐकून व्हाल थक्क!

Wealthiest MLA in Maharashtra Assembly : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत (Maharashtra Elections 2024) महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. या बरोबरच राज्यात पुन्हा महायुती सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. या निवडणुकीत महायुतीने तब्बल 233 जागा जिंकत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे.

सर्वाधिक 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 1980 नंतर कोणत्या एका पक्षाने इतका मोठा विजय महाराष्ट्रात मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची पुरती दाणादाण (MVA) उडाली. या आघाडीला फक्त 46 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस 16, ठाकरे गट 20 आणि शरद पवार गटाला फक्त 10 जागा मिळाल्या आहेत.

या निवडणुकीत एकूण 4 हजार 136 उमेदवार रिंगणात होते. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने ही (Election Commission) माहिती जाहीर केली आहे. ADR (Association for Democratic Reforms) च्या आकडेवारीनुसार विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांकडे सरासरी 43.42 कोटींची संपत्ती आहे. तर 2019 मधील निवडणुकीत विजयी झालेली उमेदवारांकडे सरासरी 22.42 कोटींची संपत्ती होती. म्हणजेच यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त कोट्याधीश आमदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यावेळी निवडून आलेल्या एकूण पाच आमदारांकडे 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. आताच्या विधानसभेत सर्वाधिक श्रीमंत आमदारांची माहिती घेऊ या..

पाच वर्षांत संपत्तीत तब्बल दहापट वाढ; पराग शहा सर्वात श्रीमंत उमेदवार

घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विजयी झालेले भाजप आमदार पराग शाह सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत. त्यांच्याकडे एकूण 3 हजार 383 कोटींपेक्षा (33,83,06,20,898) अधिक संपत्ती आहे. याच प्रमाणे पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर 475 कोटींपेक्षा (4,75,85,39,330) जास्त संपत्तीचे मालक आहेत. मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 447 कोटींपेक्षा (4,47,09,23,931) जास्त मालक आहेत.

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे 333 कोटींची (3,33,32,95,113) संपत्ती आहे. समाजवादी पार्टीचे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार अबू आझमी यांच्याकडे 309 कोटींपेक्षा (3,09,44,21,964) जास्त संपत्ती आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातील भाजप आमदार समीर मेघे यांच्याकडे 261 कोटींपेक्षा (2,61,39,16,592) जास्तीची संपत्ती आहे.

सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगांव मतदारसंघातील काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्याकडे 299 कोटींपेक्षा (2,99,46,10,739) जास्त संपत्ती आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशी मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे 235 कोटींपेक्षा (2,35,21,35,234) जास्त संपत्ती आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील भाजप आमदार राजेश पवार यांच्याकडे 212 कोटींपेक्षा जास्त (2,12,83,38,777) संपत्ती आहे. पुणे शहरातील वडगाव शेरी मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडे 208 कोटींपेक्षा जास्त (2,08,29,65,072) संपत्ती आहे.

पराग शाह सर्वात श्रीमंत आमदार

महाराष्ट्र विधानसभेत यंदा भाजप आमदार पराग शाह सर्वाधिक श्रीमंत आमदार आहेत. घाटकोपर पूर्व मतदारसंघातून त्यांनी 34 हजार 999 मतांनी विजय मिळवला. 55 वर्षांचे शाह एक रियल इस्टेट बिल्डर आहेत. त्यांची एक मोठी बांधकाम कंपनी सुद्धा आहे. मागील पाच वर्षांच्या काळात त्यांच्या संपत्तीत तब्बल 575 टक्के इतकी वाढ झाली आहे. यामागे सर्वात मोठं कारण त्यांचा रियल इस्टेट इंटरप्राइज आहे.

अखेर, महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ तर शिंदे.. पवारांच्या पारड्यात काय?

सन 2019 मध्ये त्यांनी एकूण नेट वर्थ 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. आता 2024 मध्ये त्यांची संपत्ती तब्बल 3 हजार 383 कोटी इतकी अफाट झाली आहे. पराग शाह यांच्याकडे 3 हजार 315 कोटी रुपयांची चल आणि 67 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube