“Dadar Kabutar Khana आंदोलन चुकीचंच, बाहेरच्या लोकांनी..”, मंत्री लोढांनी स्पष्टचं सांगितलं

Mangal Prabhat Lodha comment on Kabutarkhana Protest : दादर येथील कबुतरखान्यावर बंदी (Dadar Kabutar Khana Protest) घातल्याने आज मुंबईतील जैन समाज आक्रमक (Mumbai News) झाला होता. आज समाजबांधवांकडून कबुतरखान्याच्या परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. संतप्त झालेल्या आंदोलकांनी ताडपत्री फाडली, बांबूही उखडले. यानंतर मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी (Mangal Prabhat Lodha) या ठिकाणी येऊन शांतता राखण्याचे आवाहन केलं. कबुतरखान्याजवळ झालेलं आंदोलन चुकीचंच होतं. या आंदोलनात बाहेरचे लोक घुसले होते, असा दावा मंत्री लोढा यांनी केला.
संपूर्ण प्रकरण काय?
कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध बीएमसी आता एफआयआर दाखल करण्यात आली. माहीममध्ये अशा प्रकारचा पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर तणाव वाढू नये म्हणून कबुतरखाना परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की हे केवळ कबुतरांना खायला घालण्याचे ठिकाण नाही तर भावनांशी जोडलेले ठिकाण आहे.
2 ऑगस्टच्या रात्री बीएमसीने दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना संकुल पूर्णपणे प्लास्टिकच्या चादरी आणि बांबूच्या बांधकामांनी झाकले. जेणेकरून लोक तिथे अन्न टाकू शकणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालण्यास बंदी घालण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. कोणीही आदेशाचे उल्लंघन करू नये म्हणून तेथे नियमित देखरेख केली जात आहे.
ब्रेकिंग! कबुतरखाना बंदीविरोधात जैन समाजाचं तीव्र आंदोलन; परिसरात तणाव, पोलिसांचा हस्तक्षेप
तरीदेखील आज येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. आंदोलकांनी हातात फलक घेतले होते. जोरदार घोषणाबाजीही सुरू होती. आंदोलक त्वेषात होते. त्यामुळे तणाव वाढला होता. काही आंदोलकांची पोलिसांशी बाचाबाचीही झाली, पोलीस कर्मचारी या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, त्याचा उपयोग होत नव्हता. याच दरम्यान काही आंदोलकांनी कबुतरखान्यावरील ताडपात्री फाडली. तर काही जणांनी बांबूही तोडले.
महापालिकेने कबूतरखाना बंद करत त्यावर ताडपत्री लावली होती, मात्र आंदोलक जैन बांधवांनी ही ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केला.#JainCommunity #Protests #Kabutarkhana #BMC #Mumbai pic.twitter.com/8cDIm72yrp
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 6, 2025
काय म्हणाले मंत्री लोढा ?
जे झालं ते चुकीचं झालं. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वतः बैठक घेतली होती. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही काळजी घ्यावी लागेल. तरीही आज सकाळी जे झालं ते चुकीचं होतं. म्हणून मी याठिकाणी आलो असे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. माझी विनंती आहे की आता शांतता राखावी. कायदा हातात घेऊ नये. या घडामोडींवर राज्य सरकारचं लक्ष आहे. उद्या न्यायायात काय निर्णय होतो ते पाहू. पण आता सर्वांनी शांतता राखली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं ऐकून घेत निर्णय दिला की कबुतरांचा मृत्यू होता कामा नये. पण सामान्य माणसांच्या आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. याबाबत महापालिका योग्य ती खबरदारी घेईल असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.