ब्रेकिंग! कबुतरखाना बंदीविरोधात जैन समाजाचं तीव्र आंदोलन; परिसरात तणाव, पोलिसांचा हस्तक्षेप

ब्रेकिंग! कबुतरखाना बंदीविरोधात जैन समाजाचं तीव्र आंदोलन; परिसरात तणाव, पोलिसांचा हस्तक्षेप

Jain Community Protests Against Kabutarkhana Closed : मुंबईच्या (Mumbai) दादर परिसरातील प्रसिद्ध कबुतरखाना (Kabutarkhana) बंद केल्याच्या निषेधार्थ जैन समाजाकडून आज तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. महापालिकेने कबुतरखाना बंद करत त्यावर ताडपत्री लावली होती, मात्र आंदोलक जैन बांधवांनी ही ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केला गेला. तसंच कबुतरांना पुन्हा खाद्य देण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या दादर परिसरात मोठा राडा यावेळी (Jain Community Protests Against Kabutarkhana Closed) पाहायला मिळत आहे. तेथील परिस्थिती सध्या चिघळली असून (Jain Community Protest) पोलीस जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिस्थिती बिकट झाली असून जैन समुदाय आणि पक्षीप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत.

संपूर्ण प्रकरण काय?

कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध बीएमसी आता एफआयआर दाखल करण्यात आली. माहीममध्ये अशा प्रकारचा पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर तणाव वाढू नये, म्हणून कबुतरखाना परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, हे केवळ कबुतरांना खायला घालण्याचे ठिकाण नाही, तर भावनांशी जोडलेले ठिकाण आहे.

‘कजरा रे’ ते ‘वॉर 2’! आदित्य चोप्रांची धमाकेदार संगीत रणनीती पुन्हा एकदा, ऋतिक-एनटीआरचं गाणं थिएटरमध्येच पाहायला मिळणार

2 ऑगस्टच्या रात्री, बीएमसीने दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना संकुल पूर्णपणे प्लास्टिकच्या चादरी आणि बांबूच्या बांधकामांनी झाकले. जेणेकरून लोक तिथे अन्न टाकू शकणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालण्यास बंदी घालण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. कोणीही आदेशाचे उल्लंघन करू नये म्हणून तेथे नियमित देखरेख केली जात आहे.

बीएमसीची कारवाई

यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी बीएमसीनेही ही कारवाई सुरू केली होती, परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे ती थांबवण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने 31 जुलै 2025 रोजी एक आदेश दिला होता की, मुंबईतील सर्व 51 कबुतरखाने सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक बनत असल्याने ती बंद करावीत. न्यायालयाने असेही निर्देश दिले की, जर या ठिकाणी कोणी धान्य टाकताना आढळले तर त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 223, 270 आणि 271 अंतर्गत एफआयआर नोंदवावा.

‘कजरा रे’ ते ‘वॉर 2’! आदित्य चोप्रांची धमाकेदार संगीत रणनीती पुन्हा एकदा, ऋतिक-एनटीआरचं गाणं थिएटरमध्येच पाहायला मिळणार

 आरोग्य विभागाची भूमिका

बीएमसी आणि आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, कबुतरांच्या घरट्यांमधून निघणारी विष्ठा, पिसे आणि कचरा हवेत पसरतो. ज्यामुळे फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो. हा आजार विशेषतः वृद्ध, मुले आणि दम्यासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी गंभीर धोका निर्माण करतो. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, ऍलर्जी आणि डोळ्यांत जळजळ होणे यासारखी लक्षणे जाणवत आहेत, ज्याला डॉक्टर कबुतरांमुळे पसरणारे प्रदूषण मानत आहेत. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. बीएमसी आणि आरोग्य विभागाला आठ आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube