‘कजरा रे’ ते ‘वॉर 2’! आदित्य चोप्रांची धमाकेदार संगीत रणनीती पुन्हा एकदा, ऋतिक-एनटीआरचं गाणं थिएटरमध्येच पाहायला मिळणार

‘कजरा रे’ ते ‘वॉर 2’! आदित्य चोप्रांची धमाकेदार संगीत रणनीती पुन्हा एकदा, ऋतिक-एनटीआरचं गाणं थिएटरमध्येच पाहायला मिळणार

Aditya Chopra Kajra Re Music Strategy for War 2 : आदित्य चोप्रा (Aditya Chopra) गेली 30 वर्षे भारतातील सर्वात मोठ्या सिनेमांना वेगळ्या दृष्टिकोनातून सादर करत आहेत. वॉर 2 साठी (War 2) ते पुन्हा कजरा रे आणि धूम 3 मधील कमली गाण्याची प्रसिद्ध संगीत रणनीती घेऊन आले आहेत. यशराज फिल्म्स केवळ वॉर 2 मधील ऋतिक रोशन आणि एनटीआर यांच्या बहुचर्चित डान्स नंबरची एक झलक रिलीज करणार (Entertainment News) आहे, तर संपूर्ण गाणं प्रेक्षकांना 14 ऑगस्टपासून थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावरच पाहायला मिळणार (Music Strategy) आहे. ही झलक या आठवड्यात रिलीज होणार आहे.

एका ट्रेड सूत्रानुसार, वॉर 2 ही 2025 मधील सर्वात मोठी टेंटपोल फिल्म आहे आणि या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. सर्वांचे लक्ष ऋतिक-एनटीआरच्या डान्स नंबरवर आहे आणि आदित्य चोप्रांना हे चांगलेच माहीत आहे. तो या गाण्याबद्दलचा हायप आणि उत्सुकता रिलीजपर्यंत टिकवून ठेवू इच्छितो. पूर्ण गाणं इंटरनेटवर फुकट न देता, लोकांना थिएटरमध्ये येऊनच हे गाणं पाहायला लावायचं आहे. तो लोकांना मोठ्या पडद्यावर ऋतिक आणि एनटीआरला एकत्र डान्स करताना पाहण्याचा अनुभव द्यायचा आहे — जसं ते पाहायला हवं.

गुडन्यूज! EMI वाढणार नाही, रेपो रेट ‘जैसे थे’; आरबीआयचा मोठा निर्णय

ते पुढे म्हणतो, ही आदित्य चोप्रांची पारंपरिक यशस्वी रणनीती आहे. त्यांनी बंटी और बबलीमधील कजरा रे गाणं रिलीजपूर्वी थांबवलं होतं. ते थिएटरमध्ये पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. धूम 3 मधील सर्व गाणी त्यांनी रिलीजपूर्वी लपवून ठेवली होती. कमलीसारखी गाणी थिएटरमध्ये प्रेक्षकांवर तुफान लोकप्रिय झाली होती. आता त्यांच्याकडे ऋतिक-एनटीआरच्या या गाण्याच्या रूपात ‘सोने’ आहे. ते सहजपणे ते गाणं बाहेर देणार नाहीत. त्यांनी ठरवलंय की लोकांनी थिएटरमध्ये यावं, परत परत यावं आणि हे गाणं अनुभवावं — कारण ते इंटरनेटवर कुठेही उपलब्ध नसेल. आदित्य चोप्रा वॉर 2 साठी फूटफॉल्स आणि बॉक्स ऑफिस विक्रीवर लक्ष केंद्रित करत आहेत.”

मोठी बातमी! 27 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू, याद्या मिळाल्या; ‘या’ गोष्टींची तपासणी

अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 — YRF स्पाय युनिव्हर्सची ब्लॉकबस्टर फिल्म. यामध्ये कियारा अडवाणी प्रमुख महिला भूमिकेत आहे. चित्रपट 14 ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube