मोठी बातमी! 27 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू, याद्या मिळाल्या; ‘या’ गोष्टींची तपासणी

मोठी बातमी! 27 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू, याद्या मिळाल्या; ‘या’ गोष्टींची तपासणी

Mukhyamantri Mazi Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेत आतापर्यंत 42 लाखांवर महिला अपात्र ठरल्या आहेत. आता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील 26 लाख 34 हजार महिला आहेत त्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यांना देण्यात आली आहे. या महिला लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी या योजनेची सुरुवात झाली होती. महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून तब्बल 2 कोटी 59 लाख महिलांनी अर्ज केले होते. या महिलांना लाभ देण्यासाठी दरवर्षी 54 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील असे सुरुवातीला स्पष्ट करण्यात आले होते. 2025-26 च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

दसऱ्या-दिवाळीत आनंद नाहीच? शिवभोजनही अडचणीत! ‘लाडकी बहीण’ मुळे तिजोरीवर ताण? 

या योजनेत सरसकट अर्ज मंजूर करण्यात आले होते. निकषांची योग्य तपासणी झाली नाही. त्यामुळे अनेक अपात्र महिलांना पैसे मिळत होते. याबाबत तक्रारी वाढू लागला. तसेच दर महिन्याला हजारो कोटी रुपये खर्च करणे सरकारलाही कसरतीचे ठरू लागले. त्यामुळे लाभार्थ्यांची पडताळणी केली जाऊ लागली. सुरुवातीला चारचाकी वाहन असलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

त्यानंतर संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना याशिवाय शासनाच्या वैयक्ति लाभाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांची पडताळणी करण्यात आली. सरकारी नोकरदार महिला, बोगस पुरुष लाभार्थ्यंचीही पडताळणी झाली. यानंतर आता माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीनुसार वयोगट व एकाच कुटुंबातील जास्त लाभार्थींची पडताळणी सुरू झाली आहे. यात अपात्र ठरणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे.

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिला या योजनेत आहेत. या महिलांची पडताळणी करण्यासाठी आयकर विभागाला पत्र पाठवण्यात आले होते. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांची यादीची मागणी करण्यात आली होती. या यादीची पडताळणी झाली तर आणखी बऱ्याच महिला अपात्र ठरतील असे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत किती झाली नोंदणी? मंत्री अदिती तटकरेंनी दिली आकडेवारी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube