राज्यात जवळपास 1183 जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 4 हजार महिला योजनेच्या अटी पूर्ण करत नसल्याची माहिती समोर आली आहे.
माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील 26 लाख 34 हजार महिला आहेत त्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यांना देण्यात आली आहे.
प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाभार्थी महिलांची माहिती उपलब्ध करुन देण्यास मंजुरी दिली आहे.
राज्यातील जवळपास पाच लाख लाडक्या बहिणींचा निधी महिला बालविकास विभागाकडे पडून असल्याची माहिती समोर आली आहे.
1 लाख 60 हजार 559 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात 2 हजार 652 महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे.