मोठी बातमी! शिवसेना भवनात पोलिसांची कारवाई, तेजस ठाकरे पहिल्यांदाच आंदोलनात; तिन्ही ठाकरे बंधू पोलिसांना भिडले

मुंबईतील दादर परिसरात शिवसेना भवनाजवळ पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 11T183334.306

Shiv Sena Bhavan Police Action : दादर येथील शिवसेना भवन परिसरात पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलकांवर कारवाई सुरू असतानाच शिवाजी पार्क परिसरात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनाही पोलिसांनी अडवलं. त्यानंतर दादरमध्ये पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी कारवाई केली. या घडामोडींमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

शिवसेना भवनात पोलीस घुसल्याचं समजताच ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे घटनास्थळी उतरले. त्यांनी मोर्चाची जबाबदारी सांभाळत पोलिसांसह सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांच्या कारवाईनंतर ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र दादर परिसरात पाहायला मिळालं.

follow us