मध्यरात्री ATS पथकाची भिवंडीत धाड; ठाण्यात संशयास्पद हालचाली, मोठं सर्च ऑपरेशन

मध्यरात्री ATS पथकाची भिवंडीत धाड; ठाण्यात संशयास्पद हालचाली, मोठं सर्च ऑपरेशन

Maharashtra ATS Raids In Bhiwandi : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) 2003 मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai) प्रकरणातील दोषी साकिब नाचन याच्या पडघा गावातील घरी छापा टाकला आहे. साकिब नाचन याच्या नव्या संशयास्पद हालचालींमुळे (ATS Raids) ही कारवाई करण्यात आल्याचं सागितलं जातंय. या छाप्यात अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची देखील शक्यता (Terror Conspiracy Case) आहे.

आज सकाळी एटीएसने भिवंडी तालुक्यातील बोरिवली गावात मोठं सर्च ऑपरेशन (Terror Conspiracy Case) सुरू केलंय. संपूर्ण गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून एटीएसची टीम अनेक संशयास्पद व्यक्तींच्या घरी छापेमारी करत आहे. संपूर्ण गावाला यामुळे छावणीचं स्वरूप आलंय. या कारवाईमध्ये ठाणे ग्रामीण, रायगड आणि ठाणे पोलीस दलातील कर्मचारी देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

Ukraine Attack : भारताला जीवनदान अन् स्वतःच्याच मैदानात हार; S-400 रशियात का झालं फेल?

संपूर्ण गावाला छावणीचं स्वरूप

महाराष्ट्रात एटीएस इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाशी संबंधित कथित दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवलीत आज पहाटेपासून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी सुरू केली आहे. या कारवाईमुळे गावात 450 ते 500 पोलीस आहेत. या सर्च ऑपरेश दरम्यान 8 ते 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून कोणती माहिती मिळाली? याबाबत अजून एटीएसने कोणताही खुलासा केला नाही. परंतु दहशतावादाला लगाम लावण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं.

कर्ज स्वस्त होणार; RBI तिसऱ्यांदा कमी करणार रेपो दर; जाणून घ्या सर्वकाही

दहशतवाद्यांचा तळ म्हणून ओळख

बोरिवली गावाची साकिब नाचण आणि इतर दहशतवाद्यांचा तळ म्हणून ओळख आहे. याअगोदर या गावातून अनेकदा दहशतवाद संबंधित कारवाईच सहभागी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलंय. येथून साकिब नाचण, त्याचा मुलगा आणि इसिसमधील दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या 16 जणांना अटक देखील करण्यात आली होती. या सर्व कारणांमुळंच हे गाव सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आहे.

साकिब नाचण कोण?
साकिब नाचण प्रतिबंधित स्टूडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा पदाधिकारी असून दोन दहशतवादी प्रकरणांत दोषी आहे. 2002-2003मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड येथे बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणांत साकिबचा सहभाग असल्याचा आरोप आहे. 2017 मध्ये शिक्षा पूर्ण केल्यानंतर साकिब कट्टरपंथी कारवायांत सहभागी झाल्याचा देखील आरोप आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube