“ठाण्यात येऊन शिंदे साहेबांवर आरोप केले तर ठाण्यातून परत जाणार नाही, ही धमकीच समजा” ; नरेश म्हस्केंचा विरोधकांना इशारा

Naresh Mhaske Warning पुर्णेकर हत्या प्रकरण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.

Naresh Mhaske Warning Pradeep Purnekar Murder Case Thane

Naresh Mhaske Warning Pradeep Purnekar Murder Case Thane: ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या हत्येला 28 दिवस उलटूनही आरोपींवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत ठाकरे गट आणि पूर्णेकर कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. गुरुवारी (29 ऑक्टोबर) पूर्णेकर यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे.

पराभव मान्य, पण चौकशी झालीच पाहिजे, पुणे शिक्षक मतदारसंघातील कथित पैशांच्या वाटपावर दत्तात्रय सावंत आक्रमक

‘उद्या ठाण्यात येऊन शिंदे साहेबांवर आरोप केले, तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही. आंदोलनात चुकीचं वक्तव्य केलं, तर तो नेता ठाण्यातून परत जाणार नाही. ही धमकी समजायची असेल, तर धमकी समजा,’ असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे गुरुवारच्या मोर्चाआधी ठाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला 28 दिवस उलटले आहेत. या प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर सूत्रधार असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीय आणि ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

Vidhan Parishad MLC Result : मैत्रीपूर्ण लढतीत ‘कमळ’च वरचढ; कौस्तूभ गावडेंनी शिवसेनेचा पाठिंबा फेल ठरवला!

बुधवारी पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर अनेक तास ठिय्या आंदोलन केलं. दुसरीकडे, पूर्णेकर यांच्या समर्थकांनी घोडबंदर आणि मानपाडा परिसरात रस्त्यावर उतरून वाहतूक रोखल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनांनंतर गुरुवारी जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे.

‘शिंदे साहेबांचा अपमान सहन करणार नाही’

नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका केली. ‘मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे लोक करत आहेत. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलत आहेत. शिवसेना गप्प बसणार नाही. काल जे झालं, त्यानंतर आता जशास तसं उत्तर दिलं जाईल,’ असं ते म्हणाले.

‘वंदे मातरम्’च्या अवमानाचा आरोप, भालचंद्र मुणगेकरांना एशियाटिक सोसायटीची कारणे दाखवा नोटीस

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे पूर्णेकर कुटुंबीयांच्या घरी जाऊन आले होते. त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी कुटुंबीयांचं बोलणं करून दिलं होतं, असं म्हस्के यांनी सांगितलं. तरीही शिंदे यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘काल अनेक तास रस्ते बंद करण्यात आले. कालच आम्ही त्यांना विरोध करू शकलो असतो, पण आम्ही तसं केलं नाही. मात्र, आता शिंदे साहेबांचा अपमान सहन करणार नाही. चुकीच्या पद्धतीने वागणार असाल, तर ठोशास ठोसा देऊ,’ असा इशाराही त्यांनी दिला.

अर्णब चक्रीवादळामुळे विमान आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम, अनेक गाड्या रद्द, प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन

उद्याच्या मोर्चात ठाकरे गट काय भूमिका घेणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील कारवाईच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चाआधी नरेश म्हस्के यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत. गुरुवारी होणाऱ्या मोर्चात ठाकरे गटाचे नेते कोणती भूमिका मांडणार आणि म्हस्के यांच्या विधानाला काय प्रत्युत्तर देणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

follow us